जयश्री कुलकर्णी अंबासकर, मूळची नागपूरची…..दहा वर्षापासून कुवेतला वास्तव्य. नागपूर आकाशवाणीवर बालविहार पासून तर युवावाणी, नाटकं, निवेदन ह्यात मनसोक्त विहार, नागपूरच्या डॉ.चित्रा मोडकांकडे गायनाचं शिक्षण, मुंबई दूरदर्शनवर भगवान परबांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखती घेतल्या, पुढे सौदी अरेबियाच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम सादर केलेत. दहा वर्षापासून कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात कल्पक निवेदन, लेखन, गायन, अभिनय. कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाच्या अस्मिता गीताचं लेखन आणि गायन.
२००५ मधे “स्पर्श चांदण्याचे” ह्या व्हिनसने रिलीज केलेल्या आणि विवेक काजरेकरांनी संगीतबद्ध केलेल्या अल्बम मधे सुरेश भट, वसंत बापट, सदानंद डबीर ह्या दिग्गजांसोबत तीन गीतांचे लेखन जी गायली आहेत सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणींनी.
२० मार्च २००८ ला “सारे तुझ्यात आहे“ ह्या फ़ाऊंटन म्युझिक कंपनीने रिलीज केलेल्या आणि अभिजीत राणेंनी संगीतबद्ध केलेल्या अल्बम मधे संपूर्ण काव्यलेखन आणि काव्यवाचन केलंय. ह्यातली गीतं गायली आहेत देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर ह्यांनी.
१२ एप्रिल २००८ ला सुधीर मोघेंच्या हस्ते “सृजन @Broad“ ह्या भूषण केळकर संपादित, NRI कवींच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकात कवितांचा समावेश. ह्यात संदीप खरे आणि अरुणा ढेरे ह्या मान्यवर कवींनी काही कवितांचे काव्यवाचन केलेल्या सीडी मधे माझ्या कवितेचा समावेश आहे. ह्या पुस्तकाला Publication Award चं nomination मिळालंय.
मायबोली, मनोगत, मिसळपाव, सुरेश भट ह्या मराठी वेबसाईट वर नियमित लिखाण. ह्यात मायबोलीच्या दशकपूर्तीच्या दिवाळी अंकात मी सादर केलेल्या “मी आणि माझी मायबोली“ ह्या काव्यलिखाण आणि काव्यगायनाला प्रथम पुरस्कार मिळाला.
रंगदीप, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी अंक २००८ मधे कविता स्पर्धेची परिक्षक.
९ डिसेंबर २००८ ला फाऊंटन म्युझिक कंपनीने रिलीज केलेल्या “तुझा चेहरा“ ह्या अल्बम मधे गीतलेखन. संगीतकार – अभिजीत राणे, गायिका- महाराष्ट्राची महागायिका-संगीता चितळे.
१ मे २००९, कुवेतच्या “तरंग” कार्यक्रमात “Pearls of Values” ह्या कार्यक्रमाचं गीतलेखन आणि गायन. संगीतकार- विवेक काजरेकर. नृत्यदिग्दर्शन – प्रेरणा वलीवडेकर.
२००९, फाऊंटन म्युझिकने काढलेल्या देवकी पंडितांच्या “सदाबहार देवकी” ह्या अल्बमच्या दुसर्या भागात मी लिहिलेल्या चार गाण्यांचा समावेश.
९ सप्टेंबर २०१० ला “गण गण गणात गणपती“ ह्या शौनक अभिषेकींच्या हस्ते प्रकाशित झालेल्या अल्बम मधे गीतलेखन. संगीतकार- योगेश जोशी, गायक- योगेश आणि सारिका जोशी.
“स्टार माझा” ने घेतलेल्या “ब्लॉग माझा ३” ह्या स्पर्धेत “माझी मी – अशी मी” ह्या माझ्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पर्धेचे परिक्षक होते, लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा.साधना), माधव शिरवळकर( आय टी तज्ञ).
१ जानेवारी २०११, महाराष्ट्र मंडळ, कुवेत च्या कार्यकारिणी समितीत जनरल सेक्रेटरी म्हणून निवड.
२०११, फाऊंटन म्युझिकने काढलेल्या “भावसरगम” ह्या “मराठीतील अनमोल काव्यरचना” ह्या सदरातल्या MP3 सीडीत मी लिहिलेल्या सहा गाण्यांचा समावेश. शांता शेळके, ग्रेस, विंदा करंदीकर, आरती प्रभू, ना.धो.महानोर, सुधीर मोघे, संदीप खरे यासारख्या दिग्गजांसोबत समावेश.
३० जानेवारी २०१२, मायबोली.कॉम ह्या साईट चं शिर्षक गीत तयार झालं. ”मिले सूर मेरा तुम्हारा” च्या धरतीवर ५ देशातल्या एकूण २१ गायकांनी गायलेलं हे गीत योगेश जोशी ह्याने संगीतबद्ध केलंय आणि उल्हास भिडे ह्यांनी लिहिलंय. ह्या शिर्षक गीतात गायन.
५ एप्रिल २०१२, मायबोली.कॉम ह्या साईटने मायबोलीच्याच निवडक ६ कवींच्या कवितांच्या ओळी घेऊन “मायबोली बुकमार्क्स” तयार केले. या निवडक ६ कवींमध्ये समावेश !!
६ मे २०१२, माझ्या ”धुक्याच्या दुपारी” ह्या अल्बमचं सुप्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे ह्याच्या हस्ते पुण्यात प्रकाशन. गीतकार म्हणून हा माझा पाचवा अल्बम. संगीतकार – सुनील दांडेकर. गायक – रविंद्र शालू, धनश्री गणात्रा, चैतन्य कुलकर्णी आणि सुनील दांडेकर.