तुळशीच्या लग्नातलं माझं रुखवत, originally uploaded by Jayashree Ambaskar.
आमच्या महाराष्ट्र मंडळाने तुळशीच्या लग्नाचा दणक्यात बार उडवला. मंगलाष्टकं, उखाणे, रुखवत, वरात……….. सगळं सगळं अगदी ख-या लग्नासारखं.
हे माझं रुखवत. गुलावाचे चिरोटे आणि चंद्रकोरीचे शंकरपाळे.
लेक सासरी जाताना आईच्या डोळ्य़ातलं पाणी…….. नकोच त्याची आठवण! रुखवताच्या सप्तपदीमधे साकारलेलं आईचं मनोगत माझ्या शब्दात…..
पहिलं पाऊल
जाशी अपुल्या सासरी
आज माहेरा सोडून
सप्तपदी तू चालशी
हात सख्याचा धरुन
दुसरं पाऊल
नको पाहूस तू राणी
पाठी वळून वळून
मागे उभी तुझी माय
आसू डोळ्यात घेऊन
तिसरं पाऊल
लक्षुमीच्या पावलांनी
माप ओलांडून दारी
समृद्धीची पखरण
कर राजसाच्या घरी
चौथं पाऊल
तुझी सौख्याची पावलं
उमटू दे दाही दिशा
बहरु दे आसमंत
उजळू दे दाही दिशा
पाचवं पाऊल
हळदीच्या देहावर
उमलू दे गं चांदणे
चुड्यावर हिरव्या त्या
फुलू दे नवे तराणे
सहावं पाऊल
लाल मेंदीच्या हातानं
संसार नवा सजू दे
माहेराची आठवण
काळजातच राहू दे
सातवं पाऊल
सौभाग्य लेणं लेवून
सजली गं माझी लेक
होवो संसार सुखाचा
हाच आशीर्वाद एक
जयश्री

रुखवत मस्त आहे. आईचे मनोगत तर मस्तच जमलंय!अगदी पारंपारिक ओव्यांचा सुगंध येतोय त्यांना.अजून काय बोलू?
खुप मस्त जया खुपच छान ! हळव होत मन हे वाचुन !
माणिक जोशी
pls send me tulsi kostak today
khup chan (Thread ceremony (munj) ca rukhwant kasa ani kaya karaca
khup chan Thread ceremony (munj) ca rukhwant kasa ani kaya karaca
धन्यवाद अनघा !!
मुंजीला पण खूप काही करता येईल. आजकाल रुखवताची पद्धत पण बदललीये. अशा शोभेच्या वस्तूंपेक्षा उपयोगी वस्तू ठेवण्याकडे जास्त कल आहे.
hi… this is ratna from nagpur..just hit your site while searching rukhwant thru google…
munj karita rukhwanta madhye exactly kaya kaya thevta yeael jey aplyala ghari karta yeael kiwha kuthe tey market madhye milel ka pune mumbai la??
रत्ना, मला नाही गं फारशी कल्पना !!
sagla vachun khup chan vatla karan 2 mahine zale mazi lek lagna houn us la geli.asa vegla vachayla milala ,thanks.
smita.
स्मिता….. धन्यवाद
लेकीच्या लग्नाला फक्त दोनच महिने झालेत ……म्हणजे घर खूप सुनं सुनं वाटत असेल ना गं…. आणि त्यात असं काही वाचलं की मन हळवं होत असेल ना… !! तुझ्या मुलीचा नवा संसार खूप सुखाचा होऊ दे…… !!