प्रेम – डोळस की आंधळं ?

फेब्रुवारी 24, 2007 at 4:58 pm | In मनातलं...!, मराठी | 12 Comments

नुकताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला.  कुठे नवर्‍यानी भेट दिली म्हणून आनंद….. तर एक छोटंसं गुलाबाचं फुलंही दिलं नाही म्हणून नाराजी.   आता हे जरी कितीही खरं असलं तरी नुसत्या दिखाऊ प्रेमाची किंमत शून्य असते.  मला मी लहान असताना माझ्या आईनी सांगितलेली गोष्ट तुमच्या सोबत शेअर करतेय.

एका गावात दोन चांगले मित्र रहात असतात.  वेळेवारी दोघांचीही लग्नं होतात.  दोघांनाही चांगल्या बायका मिळतात.  काही दिवसांनी दोघांच्याही घरात पाळणा हलतो.  संसारवेलीवर छानसं फ़ुल उमलतं.  जसजशी दोन्ही मुलं  मोठी होतात…तसतशी ती दोघंही एकमेकांच्या जास्त जवळ येतात.  आपल्या वडीलांप्रमाणे अगदी पक्के मित्र होतात.  

एक दिवस दोन्ही आया आपल्या मुलांना शाळेत सोडायला जात असतात. दोन्ही नवरे कुठल्याशा कामानिमित्त दुसर्‍या गावी गेले असतात.  मुलं थोडी पुढं चालत असतात आणि आया गप्पा करत करत त्यांच्या मागे….!  तेव्हढ्यात समोरुन त्यांचा अजून एक मित्र धावत धावत येतो आणि दोघी आयांना ती धक्कादायक बातमी सांगतो.  बातमी असते दोघाही मित्रांच्या अपघाताची ! दोघीही अगदी हादरुन जातात.  कशातरी धावत पळत मुलांना घेऊन हॉस्पिटलमधे पोचतात.  तिकडे दोन्ही मित्रांच्या मृत्युची बातमी त्यांची वाट बघत असते. 

बातमी कळल्यावर दोघी वेड्‍यापिशा होतात.  त्यातली एक बायको मागचापुढचा विचार न करता  हॉस्पिटलच्या भिंतीवरुन उडी मारुन आपला जीव देते.  नवर्‍यावर अतोनात प्रेम असतं ना तिचं. सगळे जण तिच्याबद्दल कौतुक व्यक्त करतात……….की बघा….पतीविरह सहन न झाल्यामुळे त्या पतिव्रतेनी आपला जीव दिला.  धन्य त्यांचं प्रेम ! इकडे त्यांचा मुलगा (आपण त्याला ‘राम’ म्हणू) कावराबावरा होऊन सगळं बघतच बसतो.  काय झालंय हे त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतं.  त्याच्यावर जणू आभाळंच कोसळतं.  एकाच वेळी तो आपले माता पिता दोन्ही गमावून बसतो.

दुसर्‍या बायकोचं सुद्धा आपल्या नवर्‍यावर तितकंच प्रेम असतं.  पण ते आंधळं नसतं.  आपल्या नवर्‍याच्या मृत्युमुळे ती सुद्धा हादरली असते पण तरीही ती जीव वगैरे देऊन आपलं प्रेम सिद्ध करायच्या भानगडीत पडत नाही.  आता तिच्यापुढे सगळ्यात महत्वाचं असतं तिच्या मुलाचं (हा ‘शाम’) भविष्य.  पित्याचं छत्रं तर डोक्यावरुन नाहीसं झालंच असतं….. आता आपणही आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर ह्याचं काय…..?  असा विचार करुन ती आपल्या उरातलं दु:ख बाजूला ठेवून आपलं सगळं लक्ष आपल्या मुलावर केंद्रीत करते.  रामलाही ती तिचाच मुलगा मानून वाढवते. 

पण रामच्या मनातून मात्र ही गोष्ट काही केल्या जात नाही की आपल्या आईनं जीव देताना आपला विचार केला नाही.  तो एकाच वेळी मातृपितृप्रेमाला पारखा होतो.  तो आपल्या आईला कधीच माफ़ करु शकत नाही.

याउलट शाम मात्र आपल्या आईला अजूनच मानायला लागतो.  कारण त्याची  आई त्याच्या भविष्याचा विचार आपल्या प्रेमाच्याही आधी करते.  एकासाठी आई दैवत बनते तर दुसर्‍यासाठी ती स्वार्थी ठरते. 

तात्पर्य काय तर….. प्रेमापेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचं असतं.  प्रेम डोळस असायला हवं.  आंधळ्यासारखं प्रेम करुन तुम्ही आनंदापेक्षा दु:खाला जास्त सामोरं जाता.

12 प्रतिक्रिया »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

  1. चांगली बोधकथा!कधीही प्रेमापेक्षा कर्तव्य हे श्रेष्ठ असते हेच खरे आहे.

    प्रमोद देव.

  2. ख्ररय. प्रेम आंधळं नसवे. अश्यारीतीने जीव देणे म्हणजे शुद्द्द मुर्खपणा.

    Jayashree,

    I have not seen anynone posting their photograph on blogs. I do not know if it’s the right thing to do.

  3. प्रमोद, हरे……. धन्यवाद!
    हरे… Thanks for the concern :) I will take care. आणि जे काय व्हायचंय ते तसंही होणारच.

  4. jayu, chhan lihites. regularly lihiteys mhanun tuza likhan vachayachi savay zaliye. :)

  5. I Like It Very Very moral story for Every couple!

  6. i like this story very much .its morral for everyone.

  7. such a nice

  8. such nice

  9. प्रेम – डोळस की आंधळं ?
    February 24, 2007 at 4:58 pm | In मनातलं…!, मराठी | 8 Comments

    नुकताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला. कुठे नवर्‍यानी भेट दिली म्हणून आनंद….. तर एक छोटंसं गुलाबाचं फुलंही दिलं नाही म्हणून नाराजी. आता हे जरी कितीही खरं असलं तरी नुसत्या दिखाऊ प्रेमाची किंमत शून्य असते. मला मी लहान असताना माझ्या आईनी सांगितलेली गोष्ट तुमच्या सोबत शेअर करतेय.

    एका गावात दोन चांगले मित्र रहात असतात. वेळेवारी दोघांचीही लग्नं होतात. दोघांनाही चांगल्या बायका मिळतात. काही दिवसांनी दोघांच्याही घरात पाळणा हलतो. संसारवेलीवर छानसं फ़ुल उमलतं. जसजशी दोन्ही मुलं मोठी होतात…तसतशी ती दोघंही एकमेकांच्या जास्त जवळ येतात. आपल्या वडीलांप्रमाणे अगदी पक्के मित्र होतात.

    एक दिवस दोन्ही आया आपल्या मुलांना शाळेत सोडायला जात असतात. दोन्ही नवरे कुठल्याशा कामानिमित्त दुसर्‍या गावी गेले असतात. मुलं थोडी पुढं चालत असतात आणि आया गप्पा करत करत त्यांच्या मागे….! तेव्हढ्यात समोरुन त्यांचा अजून एक मित्र धावत धावत येतो आणि दोघी आयांना ती धक्कादायक बातमी सांगतो. बातमी असते दोघाही मित्रांच्या अपघाताची ! दोघीही अगदी हादरुन जातात. कशातरी धावत पळत मुलांना घेऊन हॉस्पिटलमधे पोचतात. तिकडे दोन्ही मित्रांच्या मृत्युची बातमी त्यांची वाट बघत असते.

    बातमी कळल्यावर दोघी वेड्‍यापिशा होतात. त्यातली एक बायको मागचापुढचा विचार न करता हॉस्पिटलच्या भिंतीवरुन उडी मारुन आपला जीव देते. नवर्‍यावर अतोनात प्रेम असतं ना तिचं. सगळे जण तिच्याबद्दल कौतुक व्यक्त करतात……….की बघा….पतीविरह सहन न झाल्यामुळे त्या पतिव्रतेनी आपला जीव दिला. धन्य त्यांचं प्रेम ! इकडे त्यांचा मुलगा (आपण त्याला ‘राम’ म्हणू) कावराबावरा होऊन सगळं बघतच बसतो. काय झालंय हे त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतं. त्याच्यावर जणू आभाळंच कोसळतं. एकाच वेळी तो आपले माता पिता दोन्ही गमावून बसतो.

    दुसर्‍या बायकोचं सुद्धा आपल्या नवर्‍यावर तितकंच प्रेम असतं. पण ते आंधळं नसतं. आपल्या नवर्‍याच्या मृत्युमुळे ती सुद्धा हादरली असते पण तरीही ती जीव वगैरे देऊन आपलं प्रेम सिद्ध करायच्या भानगडीत पडत नाही. आता तिच्यापुढे सगळ्यात महत्वाचं असतं तिच्या मुलाचं (हा ‘शाम’) भविष्य. पित्याचं छत्रं तर डोक्यावरुन नाहीसं झालंच असतं….. आता आपणही आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर ह्याचं काय…..? असा विचार करुन ती आपल्या उरातलं दु:ख बाजूला ठेवून आपलं सगळं लक्ष आपल्या मुलावर केंद्रीत करते. रामलाही ती तिचाच मुलगा मानून वाढवते.

    पण रामच्या मनातून मात्र ही गोष्ट काही केल्या जात नाही की आपल्या आईनं जीव देताना आपला विचार केला नाही. तो एकाच वेळी मातृपितृप्रेमाला पारखा होतो. तो आपल्या आईला कधीच माफ़ करु शकत नाही.

    याउलट शाम मात्र आपल्या आईला अजूनच मानायला लागतो. कारण त्याची आई त्याच्या भविष्याचा विचार आपल्या प्रेमाच्याही आधी करते. एकासाठी आई दैवत बनते तर दुसर्‍यासाठी ती स्वार्थी ठरते.

    तात्पर्य काय तर….. प्रेमापेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचं असतं. प्रेम डोळस असायला हवं. आंधळ्यासारखं प्रेम करुन तुम्ही आनंदापेक्षा दु:खाला जास्त सामोरं जाता.

  10. hi

    Khup Mast lihala ahes..keep it up..

  11. Kharach Prem he Andhal nasav,dolas asav, Khup Chan Ahe lekh,

  12. beautiful

यावर आपले मत नोंदवा

XHTML: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.