श्रावण सुरु झाल्यापासूनच सणांची मज्जा सुरु होते. ऊन-पावसाच्या खेळासोबतच श्रावण सोमवार, नागपंचमी, जन्माष्टमी, राखी…… कितीतरी सण आपण साजरे करतो. श्रावण संपता संपताच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते. आम्ही लोक तर भारतवारी संपवून कुवेतच्या प्रवासाची तयारी सुरु करत असतो. पण एकीकडे गणपतीसाठी काय काय करायचं ह्याचं विचारचक्रही सुरु झालेलं असतं.
ह्यावर्षीचा गणपती सुद्धा खूप सारा आनंद घेऊन आला. ह्या बाप्पाच्या येण्याचा आनंदच काही और असतो. काय काय सजावट करायची, काय काय प्रसाद करायचा, कुणाकुणाला बोलवायचं….. सगळं सगळं ठरवायचं असतं. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन काय करता येईल याचा विचार तर कायम सुरु असतो.
कुवेतला सुद्धा गणपतीची खूप धूम असते. महाराष्ट्र मंडळाचा गणपती तर धडाक्यात साजरा होतोच पण घरोघरीही बाप्पाचं अगदी थाटात आगमन होतं. मग काय दहा दिवस आरत्या, प्रसाद, भजनं……… नुसता जल्लोष असतो.
आमच्या घरी बाप्पा पूर्ण दहा दिवस असतात. कुणीतरी पाहुणा म्हणून येतो आणि अगदी घरचाच होऊन जातो. पण दहाच दिवसांचा हा पाहुणा जाताना अगदी चुटपूट लावून जातो. डोळ्यात पाणी आणतो प्रत्येकाच्या ….. अर्थात पुढच्या वर्षी येण्याच्या बोलीवरच सगळे त्याला निरोप देतात.
गणपती बाप्पाचं आगमन, तो आनंद, आणि निरोपाची ती हुरहुर… हे सगळं काव्यातून मांडायचा प्रयत्न केलाय मी…… !! मायबोलीच्या गणेशोत्सवात सुद्धा सामील झालो आहोत. शब्दातून आणि गाण्यातून गणेशाचं आगमन इथे ऐका.



very good!
ganpati agdi kokani padhatine basavinyat alela ahe?
धन्यवाद
कोकणातले गणपती बघायचा योग अजून काही आला नाही त्यामुळे काहीच कल्पना नाही.
hello
Tumhi kelli ganpati chi concept khup chan ahe
Lavekar tumhla kokanatil Ganpati baghata yevo
He taya Vighnehartaya kede Prathna
jyoti
ज्योती….. मनापासून आभार तुझे…. इतकी छान प्रार्थना तू माझ्यासाठी केलीस