साखळी हायकू….. माझी पाळी
ऑक्टोबर 1, 2008 at 2:25 pm | In गंमत जंमत, मराठी | 3 Commentsसुमेधाचा साखळी हायकू पुढे नेतांना शैलेशने खो दिला….. आणि अगदी पहिल्यांदाच मी सुद्धा हायकू रचण्याचा प्रयत्न केला.
शैलेशचा हायकू होता
दाटल्या सयी
किरणांचा पहारा
भिरभिरला
………यापुढे माझा हायकू
कोकीळ गाई
सुरमयी सुगंध
दरवळला
माझा खो श्यामलीला….. http://kavadasaa.blogspot.com/
साखळीचे नियम (सुमेधाच्या अनुदिनीवरून साभार) -
१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्त होणार्या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.
3 प्रतिक्रिया »
RSS feed for comments on this post. TrackBack URI
यावर आपले मत नोंदवा
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.



छानच!
Comment by Shailesh S. Khandekar — ऑक्टोबर 2, 2008 #
प्रिय ब्लोगर ,
तुझा मराठी ब्लोग वाचुन खुप छान वाटलं..
खुप उत्तम प्रतीच लिखण तु तुझ्या ब्लोग मध्ये केलं आहेस..
परंतू हे लिखाण जस्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणही महत्वाच आहे..
त्याबद्दल मी थोड माझ्या ब्लोग मध्ये लिहिल आहे..
त्याची तुला नक्कीच मदत होइल..
चल..पुन्हा भेटुच ब्लोग मधून..
मझ्या ब्लोग वर नक्की ये..
http://pune-marathi-blog.blogspot.com/
Comment by Omkar Deshmukh — ऑक्टोबर 7, 2008 #
शैलेश…… धन्यवाद !!
ओंकार….. तुझी कॉमेंट वाचून खूप छान वाटलं !! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला आवडेल मलाही
Comment by जयश्री — ऑक्टोबर 8, 2008 #