मला जगायचंय

ऑक्टोबर 15, 2008 at 3:52 pm | In नुकतंच वाचलेलं, मराठी | 1 Comment

विनायक कुलकर्णी ह्यांनी लिहिलेलं “मला जगायचंय” हे पुस्तक डॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लिहिलंय. 

नायिका एक प्रथितयश डॉक्टर. अतिशय हुशार डॉक्टर पती. खरं तर खो-याने पैसा ओढला असता. पण आपण समाजाचंही काही ऋण फ़ेडायला हवं ह्या भावनेनं व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी आपल्या जीवाचं रान करणा-या, झोकून देणा-या आणि त्यासाठी आपलं जीवन समर्पित करणा-या नायिकेची ही कथा. 

ह्या पुस्तकाने वाचकांचे डोळे अक्षरश: खाडकन उघडतात. किती स्वत:साठी जगतो आपण…… समाजासाठी विचार तरी करतो का आपण…… फ़क्त स्वत:तच गुंतलो असतो. ह्या नायिकेसारखं समाधान किती जण मिळवतात… असे अनेक प्रश्न मनाला पडतात. सामान्य माणसाची कानउघाडणी करणारं आहे हे पुस्तक.

लेखकाचं अतिशय साध्या भाषेतलं हे लिखाण अगदी आतपर्यंत पोचतं, टोचतं, रडवतं आणि खूप काही शिकवतं सुद्धा.

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.