माझा परीघ
एप्रिल 22, 2009 at 4:50 pm | In अशी मी | 3 Commentsमनातलं..खूप खूप आतलं…….!!
माझा परीघ
इतक्या वर्षानंतर सुद्धा तश्शीच आहे नव्हाळी
तशीच कोवळी
काही फांद्या झाल्या असतील थोड्याशा जुन्या…
पण आतली ओल मात्र अगदी तश्शीच
भळाभळा वाहणारी !
एक छोटंसं मोग-याचं फुल सतत आसपास असावं…
तसा तुझा सहवास
हवाहवासा, ताजा, गंधाळलेला
इतकी सवय झालीये ना त्याची !!
कधी हेच मोग-याचं फुल अबोली बनतं ना…
तेव्हा मात्र मन कावरंबावरं व्हायला लागतं
अबोलीच्या मनातलं काढून घेणं फार फार कठीण !
पण एकदा का ही अबोली बहरुन गुलाबाची टप्पोरी कळी झाली ना……
की सगळं जगच गुलाबी होऊन जातं माझं !
…..
…
आता हा गुलाब… आणखीनच डौलदार झालाय
डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा आलाय
केसातली ती चंदेरी वळणं…
कानावरचे थोडेसे रुपेरी केस…
जास्तच रुबाबदार दिसतो आहेस !
गालांवरच्या त्या दोन खोल खळ्यांमधे तर मी कोसळतेच आहे कित्येक वर्षापासून !
तुझ्या डोळ्यातली मिश्किली…. माझा श्वास आहे
माझं जगणं, मरणं त्यावर अवलंबून आहे
कायमच एक सखा होऊन राहिलास
माझं बालपण टिकवलंस
वेडेपण गोंजारलंस…
तारुण्य जपलंस….!!
अतिशय समृद्ध आणि तृप्त आयुष्य दिलंस मला
तुझ्या परिघातच आहे माझं जग सारं
ते असंच राहू दे.
तुझी सखी
3 प्रतिक्रिया »
RSS feed for comments on this post. TrackBack URI
यावर आपले मत नोंदवा
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.



फारच छान मनातला ओलावा अन तारुण्य जपणारी कविता ।
Comment by Asha Joglekar — जून 9, 2009 #
premalach mahiti prem kay asath.
Comment by sandeep s. pawar — नोव्हेंबर 25, 2009 #
परीघामध्ये फुले पसरती
परिघाबाहेर फांद्या डोलती…
कधी ऐकावे कान देवून…
वर्तुळातली त्रिज्या बोलती…
मुक्त आकाशी विरहून
ठाकती, अन फांदीवरती बसती,
विश्वासाचा धरून धागा…
पक्षी किलबिलती…
u can visit my blog @ http://akhiljoshi.wordpress.com
Comment by akhiljoshi — नोव्हेंबर 28, 2009 #