आज मस्त आभाळ भरून आलेलं……. सकाळी रोजच्यासारखीच मैत्रिणीसोबत फिरायला गेले. रस्ता तोच, मैत्रिण तीच, वेळही तीच………लेकिन माहौल कुछ और था !! गुलाबी थंडीपेक्षा थोडी जास्त बोचरी थंडी ….. पावसाची जाणवेल न जाणवेल अशी भुरभुर…… सोबत ढगांचा खर्जातला गडगडाट, विजेची नाजूक मूहदिखाई…. !! मौसम कुछ इशारा तो जरूर कर रहा था !
घरी आल्यावर एका वेगळ्याच धुंदीत रशिद खां ची “बावरे नैन” लावली. नैन अपने पिया से ……… अहाहा….. ते सूर अचानक इतके माझे झालेत ना की ते फक्त माझेच वाटायला लागले. खरंच…… कधी कधी मनाची इतकी व्याकुळ अवस्था होते ना की असं वाटतं…… त्याक्षणी फक्त एकटंच राहावं, कुणाशीही बोलू नये, कोणीही काय हवं विचारू नये. कारण नेमकं काय हवं ते सांगताच येत नाही. पण काहीतरी हवं असतं हे मात्र नक्की. मग ती उणीव, ती मागणी एखादं गाणं इतक्या विलक्षण तऱ्हेने पूर्ण करते ना….. की मग त्या गाण्याशी नेहेमीसाठी ऋणानुबंध जुळतात. तो आज बारी थी……… रशिद मियां के बावरे नैन की !!
आता दिवसभर हेच सूर पाठलाग करणार……रुंजी घालणार ….. उगाच हसवणार, उगाच डोळ्यात पाणीही आणणार !!
आदाब अर्ज है मोहतरमा,
मौसम तो इशारा करता है कई बार और अक्सर हम अकेले होते है और लगता है के कोई हमकदम चाहिये था इस वक्त. एक ऐसा हमकदम जो हमराजंभी हो. दिलकी कश्ती गुजरे दिनोंके समुंदरमे खो जाती है. अक्सर इस तरहकी तकलीफ दिलको मौसम देता है. खास करके बारिश, …और कभी सुनहरी धूपभी.
हमें याद है आपकी दाद सुरेशभट.इन पर. मेरी लिखी हुई गजलोंको आपने सराहा…इसिलिये तहेदिलसे शुक्रिया.
जाते जाते कुछ हमारी तरफसे..
फुले पाहण्याचे कुठे भान होते
फुलाहून सुंदर तुझे हात होते
– केदार
आदाब केदार
सही फरमाया जनाब आपने !!
बाकी जाता जाता तुम्ही लिहिलेल्या ओळी एकदम खास !!
तूला गंमत माहितीये…. आज मला का कोण जाणे वाटलं जयश्रीची पोस्ट नाही बरेच दिवसात…. आणि इथे आले तर सुरेल पोस्ट तयार…..
Shooooo Shweet Tanvi
अगं महाराष्ट्र मंडळामुळे हे वर्ष खूपच बिझी होते. त्यामुळे खूप काही लिहायचं होतं ते राहूनच गेलं. अब मजा आयेगा
वाह ! आज खूप दिवसांनी तुमचा ब्लोग पहिला फारच छान.इथे पण बोचरी थंडी आहे
अभय, मस्त थंडीची मज्जा घे