यंदा तिळगुळ धमाका जरा जास्तच जोरदार झाला. माझे तीळाचे लाडू, चिक्की आणि तीळगुळाच्या पोळ्या तिन्ही एकदम सुपरहिट झाले. त्यामुळे झालं काय …… की येता जाता खा खा सुरु झाली. कोणी आलं की त्यांच्यासोबत एकेक करता करता सगळ्यात जास्त तीळगुळ माझ्याच पोटात जायला लागला. ह्यांचं बारीक लक्ष होतंच माझ्यावर. मी ही काही कमी नाही. त्यांनाही एक लाडू देऊन तेरी भी चूप और मेरी भी चूप
लेकिन ये ठीक नही था !! मनात गिल्ट होताच……… दोघांच्याही. मग ना…… आम्ही एक समझौता केला. हा असा ……….
तीळगुळ खाऊन, तिळगुळ देऊन गोडवा वाढला भारी
“वजनाकडे लक्ष द्या,” म्हणाली इकडली स्वारी
मी म्हटलं, “एवढं काही टोचून बोलायला नको.
आहे जशी शोभून दिसते तुमचीच बरं बायको.”
ऐकून घेतील शांतपणे तर ते अविनाश कसले
आणखी एक लाडू खात गालात मिश्कील हसले
तू ही खा, मी ही खातो… दोघं मिळून खाऊ
पण रोज मात्र दोघं मिळून, मॉर्निंग वॉकला जाऊ
कमालीची आवडली ही, आयडियाची कल्पना,
लाडू आणि पोळ्यांचा मग, उडवला दोघांनी फन्ना
आता मात्र वजनाची, अजिबात चिंता नाही
पण फिरण्यासाठी Track शिवाय पर्यायच उरला नाही.



कविता तर फारच गो…..ड आहे आणि फोटोत दिसणारे पदार्थ म्हणजे अगदी तोंडाला पाणी !!!!!
शुक्रिया विकास
Wow Tai. Sundar Kavita and Dishes are looing very Yummy.
“Abhinandan”.
backup, pandora, limewire
धन्यवाद
kavita aawdli!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !
धन्यवाद अभय