सकाळची गोड गुलाबी सुरवात……….
एक मिश्कील, खट्याळ हसू…….त्याच्या अन् तिच्याही गालांवर
नेहेमीपेक्षा वेगळी हुरहुर……. अजूनही…… तितकीच …….. !!
त्या जाणीवेचा आनंद…..
खूप खूप सुखावह !!
काय असेल त्याचा Plan ?
निदान चॉकलेट्स तरी नक्कीच.
त्याला काय बरं द्यावं Surprise …..
……………………
………..
छे काहीच सुचत नाहीये.
तो कधीच स्वत:साठी काही घेत नाही.
नेहेमी त्याच्या माणसांचं सुख, त्यांचा आनंद फक्त ह्याचाच विचार …..
पण ती मात्र अगदी हक्काने त्याच्याकडून सगळं करवून घेते.
तो ही सामील होतो अगदी मनापासून.
इतक्या वर्षांची सवय…..
एकमेकांना जरा जास्तच ओळखायला लागलो आहोत की काय ……
ह्म्म्म्म्म्म…… तिला तसा तो बरेचदा अनभिज्ञ !
पण तो ….. अगदी प्रत्येक वेळी छानपैकी वाचून काढतो तिला.
आणि बाजी मारून जातो……..प्रत्येकवेळी.
आज काय …..
ऑफिसमधून आल्यावर दार उघडतांना चेहऱ्यावर उत्सुकता असणार तिच्याही अन् त्याच्याही
…………
इश्क हवाओमें है……इश्क फिजाओमें है …… :)
