९ जुलै. आज राजेशनी सुट्टी घेतली होती. सकाळी मस्तपैकी टेबल टेनिस खेळलो. दुपारी थोडं शॉपिंग. रात्री मासे बनवलेत. टिलापिया आणि पॉम्फ्रेट. Backyard मधे जेवण घेतलं. हवा फारच छान होती. गप्पाही मस्त रंगल्या. दुसर्या दिवशी नायगाराला निघायचं होतं त्याची तयारी केली.
सकाळी सव्वा पाचलाच घरातून निघालो. राजूनी आम्हाला Pick up point ला सोडलं. बसने आम्ही आधी New York ला गेलो. मग तिथून आम्हाला आमच्या टूर प्रमाणे वेगवेगळ्या बसेसमधे शिफ़्ट केलं. आमचा गाईड होता चायनीज Larry ! एका ठिकाणी ब्रेकफ़ास्ट करुन आम्ही Corning Museum of Glass बघायला थांबलो. काचेची ती अनोखी दुनिया बघून आश्चर्यचकित झालो. काच बनवणं कसं सुरु झालं इथपासून तर आता काचेचं काय काय बनवता येतं ते सगळं इथे बघायला मिळतं. शेवटी Live Show मधे Flower Vase आमच्यासमोर प्रत्यक्ष बनवून दाखवला तेव्हा मात्र आम्ही सगळे थक्क झालो. काय ती कलाकारी…! मान गये !! तिथल्या प्रदर्शनात मांडलेली काचेची ज्वेलरी, भांडी, फुलं, खेळणी, शोभेच्या वस्तू, पेंटींग्स हे सगळं आवर्जून बघण्यासारखं आहे.
हे सगळं मनात घोळवत पुढे निघालो. पुन्हा मधे एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. जेवण झाल्यानंतर तिथे आम्हाला Fortune Cookies मिळाल्या. आतापर्यंत फक्त सिनेमातच बघितलं होतं. त्यामुळे गंमत वाटली. माझ्या कुकीमधून जी चिठ्ठी निघाली त्यावर लिहिलं होतं, “In your heart, there is true Happiness !” अगदी मनापासून पटलं
खरंच, देवबाप्पानी किती आनंद दिलाय माझ्या जीवनात ! मनातल्या मनात बाप्पाचे आभार मानून पुढे निघालो.
लवकरच नायगारा दिसणार होता. खूप excitement होती. सगळ्यात पहिले आम्ही गेलो Goat Island ला. तुम्ही वर आणि खाली तुम्हाला American Falls आणि Bridal Falls दिसतात. पुढे डावीकडे प्रचंड नायगारा. अमेरिकेच्या बाजूने खरं तर नायगारा पूर्ण बघता येत नाही, त्याचं खरं सौंदर्य बघायचं असेल तर कॅनडाच्या बाजूने बघायला हवं. पण आम्हाला जे काय दिसलं ते आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. Cave of The Winds म्हणून जे काय आहे ना….. तिथे गेल्यानंतर तो धबधबा असा काय दिसतो की तो प्रपात अंगावर झेलून स्वत:ला त्यात झोकून द्यावसं वाटतं. आयुष्य तिथेच संपलं तरी चालेल इतकं तृप्त वाटतं. तो क्षण मी अगदी जपून ठेवणार आहे……अगदी आत. आपण धबधब्याच्या खालच्या बाजूला असतो आणि वरुन तो धबधबा आपल्या अंगावर येतोय असं वाटतं. निसर्गाच्या विराट रुपापुढे आपण किती सामान्य आहोत हे प्रकर्षाने जाणवतं. “२०१२” सिनेमात जेव्हा ती प्रचंड लाट येते आणि सगळं त्यात सामावल्या जातं आणि त्यात तो भविष्य करणारा पळून जायला नकार देऊन तिथेच उभा राहून स्वत: सगळं कवेत घेतो…… अगदी तोच प्रसंग आठवला. त्यातलं समाधान अक्षरश: त्याक्षणी जाणवलं. डोळ्यात जितकं साठवता येईल तेव्हढं साठवत निघालो. रात्री Sleep Inn हॉटेल मधे जेमतेम झोपण्यासाठी थांबलो.
सकाळी नाश्ता करुन पुन्हा नायगाराचं दर्शन घ्यायला अगदी भक्तीभावाने निघालो. गेल्यावर सुरवातीला IMAX Theatre मधे नायगाराचीच एक सुरेख फ़िल्म बघितली. Niagara Myths & Mysteries. ह्यात नायगाराबद्दलच्या Facts आणि दंतकथा आणि सुरस रम्य कथा दाखवल्या.
फ़िल्म बघून ज्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो त्या Maid Of The Mist च्या लाईनीत उभे राहिलो, बोटीत चढलो. ज्यांना भिजायचं असेल त्यांनीच डेकवर उभं रहायचं होतं. इथे न भिजता कुणाला रहायचं होतं…. !! उलट तिथेच स्वाहा व्हायला पण मनाची तयारी होती. बोट निघाली. हळूहळू ती American Falls आणि Bridal Falls ओलांडून नायगाराच्या दिशेने जायला लागली. आम्ही सगळे डोळ्यात प्राण आणून ते दृष्य बघत होतो. तेवढ्यात पक्ष्यांचा गलका झाला आणि जवळजवळ २००-३०० पक्षी एकाच वेळी आकाशात उडाले. अहा…… एकीकडे तो महाकाय नायगारा, त्याचे तुषार उडून तयार झालेलं Mist आणि त्यावर उडणारा हा पक्ष्यांचा मोठा थवा… !! एकाचवेळी काय काय बघू आणि कसं कसं बघू असं झालं. बोट पुढे सरकतच होती. हळूहळू नायगाराचा आवाका कळायला लागला. त्याचा Horse Shoe shape आता पूर्ण दिसत होता. मधेच सूर्याची किरणं पडून इंद्रधनुष्य दिसत होतं….बघता बघता आणखी एक ….चक्क दोन दोन सप्तरंगी धनुकली एकाचवेळी !! फ़ोटो किती काढायचे…. काढायचे की डोळ्यातच साठवून घ्यायचं… काही काही कळत नव्हतं. बघता बघता बोट अगदी जवळ गेली. अंगावर मस्त तुषार उडत होते. लोक आनंदाने वेडे झाले होते. काहीक्षण आयुष्यात परत परत यावेत असं वाटतं ना……त्यात हा क्षण पण असावा असं मनापासून वाटलं. बोट आता परत फिरुन आपल्या धक्क्याकडे निघाली. जातांना मात्र डोळ्यांची पापणीसुद्धा मिटाविशी वाटत नव्हती. इतक्या वर्षांपासून हा जलौघ असाच निरंतर वाहतो आहे……तितक्याच आवेगानं…. कमाल केवळ कमाल !!!
भारलेल्या अवस्थेतच जेवण केलं. तिथले प्रसिद्ध Buffalo Wings खाल्ले. परतीच्या प्रवासात डॊळ्यासमोर फक्त तोच तो होता आणि डोळ्यातून आपसूक पाणी वहात होतं…. !!
घरी पोचायला १० वाजले. राजू आणि कौस्तुभ घ्यायला आले होते. पावभाजी वर ताव मारुन पुन्हा स्वप्नात त्याच्यासोबत गुजगोष्टी करत मस्त झोप लागली.
१२ जुलै. सकाळी तयार होऊन निघालो आणि मालती-पार्थाकडे गेलो. गप्पागोष्टी झाल्यावर South Brunswick ची लायब्ररी बघितली. तिथल्या छोट्या मुलांसाठी असणार्या activities बघितल्या. तिथले नागरिक जो काही टॅक्स भरतात त्याच्या मोबदल्यात त्यांना सरकार खूप काही सुविधा देते. ही इतकी मोठी लायब्ररी त्यातलीच. नंतर भाग्यश्री कडे लंच ला गेलो. जेवणासोबत गप्पा आणि गाणी असल्यामुळे मस्त मज्जा आली. घरी आल्यानंतर मंजू आली. तिच्यासोबत पण खूप मस्त गप्पा रंगल्या. संध्याकाळी सगळे मिळून Princeton ला गेलो. गावात मस्त पायी फिरलो. Princeton University बघितली. त्यांचं Campus बघून तर चाट पडलो. केवढा मोठा परिसर !! इथेच जगातले कितीतरी मोठे शास्त्रज्ञ, इंजिनियर तयार झालेत. तिकडे ग्राऊंडवर काही मुलं खेळत होती. वाटलं….. यातलीच काही मुलं पुढे जगप्रसिध्द होतील !! तिकडे शिकतांना मुलांना मिळणारा मोकळेपणा, स्वातंत्र्य, सुविधा हे बघून त्या मुलांचा खरंच हेवा वाटला. आपल्या देशात असं कधी होऊ शकेल ???
मग तिथेच “On The Border” ह्या मेक्सिकन हॉटेल मधे जेवण घेतलं. Thousand Island Iced Tea हे पेय एकदम सुपरहीट
१३ जुलै. आज Hidden Gems चा Beech wood Park मधे मोठा शो होता. त्याची तयारी सुरु होती. संध्याकाळी तयार होऊन पार्क मधे गेलो. जवळ जवळ ३०० लोकांसमोर केलेला कार्यक्रम तुफान गाजला. आम्ही सगळे मिळून खूप नाचलो, धम्माल केली. गायक आणि निवेदक ह्यांनीही धुमाकूळ घातला. भुरभुर पावसाने हजेरी लावून सुद्धा कोणीही जागचं हललं नाही. खूप मज्जा आली. इथेच मायबोली मित्र अनिलभाई सांगोडकर भेटला. तो आवर्जून कार्यक्रमाला आल्यामुळे आनंद झाला. मायबोलीचा स्नेहबंध आहेच मुळी मजबूत !!
दुसर्या दिवशी सकाळी आनंदीकडे रामाचारी सरांचं लेक्चर होतं. ते ऐकून मग सीमा-अभिन कडे जेवायला गेलो. खाणेपिणे आणि पुन्हा गप्पा. हसण्या खिदळण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. संध्याकाळी पुन्हा एकदा New York ला निघालो. रात्री New York च्या रस्त्यांवर मस्त भटकलो. तिथल्या गर्दीत मिसळून Times Square पुन्हा अनुभवला. कुछ तो बात जरुर है ये Times Square में ! पबमधे गेलो, मनसोक्त नाचलो… !! Bahama mama ह्या पेयाने मजा आणली.
दुसर्या दिवशी सकाळी ब्रेकफ़ास्ट घेऊन शेवटचं राहिलेलं शॉपिंग करायला निघालो. धावपळ करत शॉपिंग संपवलं एकदाचं. दुपारी गिरीजा-मुरलीकडे जेवायला गेलो. South Indian Cuisine वर मस्त ताव मारला. सगळ्यांना टाटा-बाय बाय करुन घरी आलो.
हे काय….. सव्वा महिना संपला सुद्धा………. कळलंच नाही. आत्ताच तर आलो होतो……एवढ्यात जायची वेळही आली
शांतपणे बसून गप्पा तर मारल्याच नाहीत आपण… !! सकाळी उठून वॉकला गेलो नाही. झुम्पा डान्स शिकायचा होता. ते पण झालं नाही. कौस्तुभचं Campus बघायचं राहून गेलं. तिकडे फ़्लॉरिडाला मंजूकडे जाणं पण जमलं नाही…. टेबल टेनिस फक्त दोनदा खेळलो. शी बाबा…. आता पुन्हा यायला हवं निवांत…..!! पुन्हा नक्कीच यायला हवं…..मनाला हेच बजावत निघालो.
JFK Airport वर राजू-राजेश सोडायला आले. आत जायची वेळ येईपर्यंत गप्पा, फ़ोटो सुरु होतं….. जातांना हात हलले, डोळे पाणावले, घट्ट मिठी मारुन डोळ्यांनीच सांगितलं एकमेकांना…….“ दिल अभी भरा नही…..के दिल अभी भरा नही ”












तुम्ही लिहिलेल्या अमेरिका भेटीच्या चार लेखांनी आमच्या २००२ च्या आठवणींना पुनः एकदा जाग आली. प्रवाही निवेदन आणि उत्तम छायाचित्रे.
- मंगेश नाबर.
खूप खूप धन्यवाद मंगेश
पुन्हा पुन्हा अनुभव घेता यावा म्हणूनच लिहून ठेवलं
Dil abhi bhara nahi, dil abhi bhara nahi……
Love you so much!!!
राजू…… खरंच……..अजून समाधान व्हायचंय…..फिर आनाही पडेगा !!
तुमचं शाही आदिरातिथ्य उपभोगायला पुन्हा नक्की येणार …. Love u too Sweetie !!
khup chan lihila ahes mavshi
maja ali vachtana…
धन्यु श्रद्धा
मला लिहितांना पण पुन: प्रत्ययाचा आनंद मिळाला गं…. सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
आम्हाला इथे भारतात बसल्या बसल्या अमेरिका वारी घडली,छान लिहिता,सहज नेट चाळत असताना तुमचा ब्लॉग पाहिला.
लिहिते रहा……….
मनापासून धन्यवाद मेघपुष्प
haayalaa,
he MB var lihil navhatas.
aaj TP karat hyaa blogavarun tyaa blogavar udyaa maarat aalo aani he vaachal.
mast lihil aahes.
zakasrao
झकासराव……शुक्रिया
अरे हे जरा जास्तच personal आहे म्हणून इथे ब्लॉगवर लिहिलं.
छान लिहिले आहे.
बुकागंगाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा!
माझ्या अनुदिनीचा पत्ता:
http://www.prashantredkarsobat.in
धन्यवाद प्रशांत

तुलासुद्धा शुभेच्छा
Interesting ब्लॉग आहे तुझा
खूप छान डीटेल लिहिले आहे, इतके सगळे लक्षात ठेऊन / नोंद करून आणि मेहनतीने टाईप करून आम्हांला अमेरिकेची सफर घडविल्याबद्दल धन्यवाद!! अमेरिका टूर प्लान करतांना तुमच्या प्रवास वर्णनाची नक्कीच मदत होईल. नायगरयाचे विराट दर्शन आणि डबल इंद्रधनुष्य मस्तच !!
तहे दिल से शुक्रिया सरजी
अमेरिकेने मोहिनी घातली तर तुझ्यावर ! ती अशी आहे ना की तिला न पाहताच मोहिनी पडते.
अर्थात दुरून डोंगर साजरे !!!!
हो गं…..मला जाम आवडली अमेरिका !!
ह्म्म्म……तू म्हणतेस ते पण तितकंच खरंय