आता त्यांची स्वत:ची एजन्सी होती. नवीन डिझायनर्स आणि मॉडेल्स ना त्यांची ही एजन्सी launch करायची. त्यांना नवा प्लॅटफ़ॉर्म मिळवून द्यायची. त्यांच्या कल्पकतेमुळे त्या दोघांचंही या क्षेत्रात चांगलंच नाव गाजत होतं.
अशीच एकदा अनुरा नवीन मॉडेल्स चे आलेले फोटो बघत होती. लंच टाईमला ऋत्विक तिला पिक अप करणार होता. अचानक एका अतिशय सुरेख प्रतिबिंबानं तिचं लक्ष वेधून घेतलं आणि मंत्रमुग्ध होऊन ती त्याच्याकडे बघतच राहिली. एका बावरलेल्या हरिणीसारखं ते बिंब हलत होतं. तेव्हा कुठे तिला जाणवलं की ती एक जिवंत व्यक्ती आहे. तिनं मागे वळून बघितलं तेव्हा तिला तिच्या ऑफिसच्या खिडकीच्या काचेत पडलेली एका मुलीची प्रतिमा दिसली. तिची ती अवस्था बघून तिनं बाहेर जाऊन तिला आत घेतलं. इतका वेळ स्वत:ला वाचवत पळत असल्यामुळे ती धापा टाकत होती. जेव्हा तिला आपल्या सुरक्षिततेची जाणीव झाली त्यावेळी मात्र तिचं सारं अवसान गळालं आणि तिची शुध्द हरपली. अनुरानं तिला कसंबसं सोफ्यावर झोपवलं आणि तिच्याकडे निरखून बघायला लागली.
आजवर इतक्या सुरेख मुली तिनं बघितल्या होत्या पण हिचं सौदर्य काही वेगळंच होतं. तिच्या गो-या गो-या हातावर “तरन्नुम” असं गोंदलं होतं. तिच्याकडे अनुरा अगदी हिप्नोटाइज झाल्यासारखी बघत होती. ऋत्विक तिच्या अगदी जवळ येऊन तिच्या कानात “हाय स्वीटी” असं जेव्हा कुजबुजला तेव्हा ती अक्षरश: दचकली. तिचं हे असं दचकणं ऋत्विकला अगदीच नवीन होतं. कारण त्याची नूर ही कधीच बेसावध नसायची. कायम ती पूर्णपणे स्वत:ला स्वत:च्या ताब्यात ठेवू शकायची. तोच खरा तर तिचा गुण त्याला सगळ्यात जास्त आवडायचा. मग आजच ही अशी का दचकली ? जेव्हा अनुरानं त्याला ती मुलगी दाखवली तेव्हा त्याचीही नजर त्या मुलीवर खिळून राहिली. खरंच एक अतिशय नितळ, सात्विक सौदर्य होतं ते. त्याने नाव बघितलं “तरन्नुम”…… नाव उच्चारताच सुंदर लहरी झंकारल्यासारख्या वाटल्या त्याला.
” What a musical name Noor !”
” अरे, मी सुध्दा अशीच थक्क झाले रे ! काय अलौकिक सौदर्य आहे ना ?”
” She is Terrific Noor! ए….. आपण ह्या मुलीला प्रसिध्दीच्या अगदी शिखरावर पोहोचवू शकतो गं”
” ऋतू, खरं सांगू, माझ्या मनातही अगदी हाच विचार आला.”
” Great people think alike sweetie!”
” ऊहूं, माझ्या मनातले रे …. सारे तुलाच कळते.” त्याच्या नाकाला नाक घासत अनुरा म्हणाली.
” क्यूकी……एक जान है हम तुम !”
” अच्छा जी ….! आज एकदम मूड मधे आहे म्हणायची स्वारी ! ”
” Yeah! आज खरंच मस्त मूड आहे गं ! तुला एक जबरदस्त न्यूज द्यायचीये .”
” Really…….? अरे, मग सांग ना” आता अनुरालाही राहवेना.
” अगं ह्या वर्षाच्या Lakme Fashion week मधे आपल्याला पहिलाच दिवस मिळालाय, आहेस कुठे?”
” ऒ ! ऋतू, Hearty Congrats !”
” You too deserve it Sweetie! ”
” ए ऋतू……… आपण ह्या तरन्नुमला Launch करायचं का रे ? ”
“अगं पण ही कोण कुठली……. आपल्याला काहीच माहित नाहीये.”
“That you dont worry. ते सगळं मी बघते….. मी समजावेन तिला….. पण तू आहेस ना तयार?”
” Yessssssss ! ह्या तरन्नुमला आपण launch करुया….. सगळीकडे फक्त हिच चर्चा राहिली पाहिजे. Noor……… We will surely do it. ”
अन मग खरोखरच त्यांनी तरन्नुमला अशा काही थाटात लोकांसमोर पेश केलं ना …. की सगळीकडे नुसती खळबळ उडाली. त्या दोघांच्या प्रयत्नांना तरन्नुमने पण तितकीच समरसून साथ दिली.
………………… क्रमश:
उत्कंठा अजून वाढलेय.पुढे काय वाढून ठेवलेय?