आज खूप छान वाटतंय. कितीतरी दिवसांचं माझ्या पिल्लाचं स्वप्न साकार झालं. कुवेतमधे हिवाळा संपायच्या सुमारास दरवर्षी CRY ही संस्था Cricket Tournament घेते. ब-याच टीम्स भाग घेतात. ज्युनियर आणि सिनियर ग्रुप असे दोन भाग असतात त्यात. किती टीम्स नी भाग घेतलाय ह्यावर लीग मॅचेस अवलंबून असतात. माझा मुलगाही क्रिकेटवर प्रत्येक भारतीयाप्रमाणे अगदी मनापासून प्रेम करतो. प्रत्येक क्रिकेट मॅच मग ती कुठलीही असो….. अगदी भान हरपून बघतो. आणि ही टुर्नामेंट तर under 14 मुलांसाठीच असते. त्यामुळे एक विशेष जिव्हाळा !!
CRY CRICKET खेळायचं हे त्याचं तिसरं वर्ष. मागच्या दोन्ही वर्षी मनासारखा खेळ न झाल्यामुळे आणि खेळायचं हे शेवटलं वर्ष असल्यामुळे स्वारी अगदी चिकाटीने प्रॅक्टिस करत होती. बाकीचे टीम मधले साथीदार सुद्धा मनापासून तयारीत होते. आदल्या दिवशी सरांनी कॅप्टन म्हणून माझ्या अद्वैतचं नाव जाहीर केलं. आम्हाला खूप आनंद झाला. पण त्याला मात्र जाम टेन्शन होतं. आता काय Strategy ठरवायची…कोणाला कुठल्या नंबरवर बॅटिंगला पाठवायचं…… कोणाला बॉलिंग.. ..केव्हा द्यायची !! छानपैकी कागद , पेन घेऊन त्याने सगळं लिहून काढलं.
२६ तारखेला सकाळी घ्यायला बस आली तेव्हा सगळी जोरदार होती तयारी !! आमच्या महाराष्ट्र मंडळाची पिकनिक सुद्धा त्याच दिवशी असल्यामुळे मी पिकनिकला गेले आणि पप्पा मॅच बघायला गेले. तिकडे सगळं मस्त वातावरण असतं. ज्युनियर आणि सिनियर मिळून जवळ-जवळ १५-१६ टीम्स असतात. सगळी मुलं अगदी उत्साहात बागडत असतात. CRY चे अनेक स्टॉल्स लागलेले असतात. खाद्यपदार्थांचेही भरपूर प्रकार असतात. लहान मुलांच्या विविध स्पर्धाही सुरु असतात. नुसती धम्माल असते.
ह्यावर्षी मुलांनी सुरेख टीशर्ट्स मागवले होते. प्रत्येक मुलांचं नाव त्याच्या टीशर्टवर छापून घेतलं होतं. एकदम मस्त दिसत होते. ह्यावर्षी त्यांच्या टीमचं अजून एक आकर्षण म्हणजे त्यांनी घरी तयार केलेली Mongoose Bat. आयपीएल मधे “चेन्नई सुपरकिंगच्या” मॅथ्यू हेडन ने ही बॅट वापरली तेव्हापासून ती बॅट ह्या मुलांमधे चर्चेचा विषय बनली होती. त्यांनी पण ती बॅट वापरायचं ठरवलं. आधी त्यांचे सर त्यांना नको म्हणाले पण त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्यांनी परवानगी दिली. त्यांच्या हया बॅटने असे काही छक्के मारले की ज्याचं नाव ते.
सुरवातीला ३ लीग मॅचेस होत्या. त्यापैकी २ ते जिंकले आणि तिसरी Tie झाली. आता सेमीफायनल जिंकणं गरजेचं होतं स्वप्न साकार व्हायला. त्यांची सेमीफायनल सुरु असताना मी पण सामील झाले प्रेक्षकांच्या आरडाओरडीत. मोठ्या फरकाने त्यांनी ही मॅच जिंकली आणि आता फ़ायनल.
नाणेफेक जिंकून त्यांनी बॉलिंग घेतली. सुरेख गोलंदाजी करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना ४८ धावांवर रोखले. ७ ओव्हर्स ची मॅच होती. आव्हान काही फार अवघड नव्हतं. आमचे सुपुत्र आणि फैझान सलामीला निघाले. पहिल्या २ ओव्हर मधे सावधपणे खेळून ११ रन्स काढले. आणि तिस-या ओव्हरपासून मस्त फटकेबाजी करायला सुरवात केली. अद्वैत ने दोन सणासणीत षट्कार हाणले. फैझानची दुसरीकडून घोडदौड सुरु होतीच. अद्वैतचे १८ रन्स झाल्यावर तो रिटायर झाला. हा पण CRY CRICKET चा अनोखा नियम… प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळण्यासाठी . नंतर रिषभ आला त्याची “मंगूस बॅट” घेऊन आणि मस्त हाणायला सुरवात केली. १० बॉल बाकी असतांनाच विजय मिळाला. आम्ही सगळेच मैदानावर धावलो. DPS पहिल्यांदाच CRY CHAMPION झाली. कॅमे-यांचा क्लिकक्लिकाट झाला.
आता बक्षिस समारंभ होता. Indian Ambassador च्या हस्ते सगळ्यांना बक्षिसं देण्यात आली. प्रत्येक खेळाडूला मेडल आणि सर्टीफिकेट देऊन गौरवण्यात आलं. एक परिपूर्ण दिवस, एक विजयी दिवस, एक अजिंक्य दिवस अद्वैत मुळे आम्हाला अनुभवायला मिळाला 🙂
कॅमे-याने टिपलेले काही अविस्मरणीय क्षण !!
अद्वैत…तुझं मनापासून अभिनंदन !! असे प्रसंग तुझ्या आयुष्यात वारंवार येवोत !! आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो 🙂
अद्वैतचं अभिनंदन!
अद्वैतचं मनापासून अभिनंदन आणी तुम्हा दोघांचेही….मुलांचे यश आई-बाबांना जास्त सुख देते…..
पुन्हा एकदा अभिनंदन.. ह्यासाठी की आता सविस्तर समजले… बाळाचे कौतुक… अद्वैत चा अभिमान आणि तुझ्या सचिन तेंडुलकर ला भविष्यात खूप खूप शुभआशिर्वाद…आई बाबांच्या सुखात आम्ही पण सामिल…
पण त्या टी-शर्ट वर नांव आहे म्हणलीस.. ते तर नाही दिसले…दाखवा बॉ… अजून मज्जा येईल…खरं नं? नेहमीप्रमाणे मस्तं लिहीले आहेसच…
दीपिका
Reading this article from Seoul was awesome experience. All the best for your forthcoming tournaments. You just rocked it, day was yours.
Bye
pappa from seoul
देवकाका, तन्वी, दीपिका…धन्यवाद !!
तन्वी..तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे 🙂
दीपिका……टिशर्ट चा फोटो….खास तुझ्यासाठी 🙂
शाब्बास….ये हूई नं बात… अब मज़ा आया… जियो अद्वैत ९९…
धन्यवाद जयश्री…
दीपिका..
शाब्बास….ये हुई नं बात… अब मज़ा आया… जियो अद्वैत ९९…
धन्यवाद जयश्री…
दीपिका..
Congratulations…Adwait…
A upcoming allrounder from a great allrounder family…
Heartiest wishes for ur future… wish u… get more such achievements… yeh dil maange more….
Abhinandan…. once again….
from Ambekar to Ambaskar
धन्यवाद मनिष 🙂
Very nice, Congratulations..
I played lot of cricket for over 25 yrs at various levels but I never hit a six. I think, it needs a different skill..
While on the subject, I wish to inform you that Indian Opener, Chetan Chauhan’s first scoring stroke in Mumbai test cricket was a six off New Zealand pacer Hadlee in Sept1969. That was the only six, he hit in his test career spanning for over 9 yrs.
http://www.cricinfo.com/india/engine/match/63045.html
Regards
धन्यवाद 🙂
Heartiest Congratualtions Adwait ani Jayu -Avi -Aditi.
May these events come in your life again and again. May your dreams come true thought out your life.
We are proud of you young Adwait.
Luv
शुक्रिया जानेमन 🙂
Heartiest congratulations to Advait and the proud parents. May all his and your dreams for him come true.
nice photographs!!
तहे दिल से शुक्रिया दोस्त 🙂
wow!!!!khup khup shubhechha advait! gr8! ani matoshri ani pitashrinnahi khup khup shubhechha!
धन्यु अभिजीत 🙂
Congratulations to you all!!!Keep it up Advait
अभिनंदन..तुझ आणि अद्वैतचे पण….खुप खुप मोठठा हो..आणि माउ मावशी कडुन पेढे खायला ये हो..[आई काही देत नाही]आता मावशीच देते..[:फ]
my dear dau,
you got 3 7 8 10 lack points. you got a big trophy and also very very much love from me. dau, you are great and genius.
yash prasad kulkarni
नीरजा, शैलेश, प्रतिक, तन्वी, माऊ…..खूप खूप धन्यवाद 🙂
आता मावशीच्या नव्या घरी येऊ पेढे खायला….आणि मावशीला पार्टी घ्यायला कुवेतला बोलवू 🙂
यशुली…………..किती किती गोड रे…..!! दाऊला खूप खूप आनंद झाला हं 🙂
Heartiest congratulations to Adwait and Ambaskar family, keep it up.
congradulations adwait .you always achieve great things but this was amazing .GOD bless you .and achieve such merits thoughtout the life .
वर्षा आत्या…….धन्यु 🙂