स्टार माझा नं घेतलेल्या “ब्लॉग माझा ३” ह्या स्पर्धेत माझ्या ह्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस जाहीर झालंय…… खूप खूप आनंद झालाय 🙂
जगभरातले सगळे मराठी ब्लॉगर्स ह्या स्पर्धेत भाग घेतात. अनेक विषयांवरचे ब्लॉग्स असतात. यंदाही भरपूर लोकांनी भाग घेतला होता. ह्या वर्षी परिक्षक होते, लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा.साधना), माधव शिरवळकर( आय टी तज्ञ).
खरं तर हा ब्लॉग फक्त स्वत:च्या आनंदासाठी सुरु केला होता. हळुहळु लिखाण जमतंय असं लोकांच्या आलेल्या प्रतिक्रियांवरुन समजायला लागलं आणि आता तर ब्लॉग लिहिणं ही गरजच झालीये. ह्या ब्लॉगने मला खूप काही दिलंय. माझी Identity मिळाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बक्षिस मिळावं ह्यासाठी हा अट्टाहास कधीच नव्हता पण बक्षिस मिळालं असं कळल्यावर अगदी मनापासून आनंद झाला एवढं मात्र खरं 🙂
सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन 🙂
अभिनंदन जयश्री 🙂
शुक्रिया जानेमन…….तुझं पण खूप खूप अभिनंदन गं……तुझं नाव विजेत्यांमधे वाचून खूप आनंद झाला 🙂
जयश्री
तुला आधीपासूनच प्रसिध्दी भरपूर मिळलेली आहेच. तेंव्हा हे बक्षिस फक्त एक अॅकनॉलेजमेंट आहे तुझ्या साठी.
अभिनंदन..
मनापासून धन्यवाद महेंद्र. हे प्रसिद्धीसाठी नव्हतंच रे….. स्वत:च्या आनंदासाठी लिहिणं आहे हे……अर्थात बक्षिस हा बोनस 🙂
अभिनंदन. 🙂
गंगाधर……धन्यवाद 🙂
तुमचंही अभिनंदन…..!!
अभिनंदन !!
धन्यवाद सलील 🙂
Jayutai, hearty congrats! We all are proud of you!
ash
शुक्रिया जानेमन 🙂
खरं तर हा ब्लॉग फक्त स्वत:च्या आनंदासाठी सुरु केला होता. हळुहळु लिखाण जमतंय असं लोकांच्या आलेल्या प्रतिक्रियांवरुन समजायला लागलं आणि आता तर ब्लॉग लिहिणं ही गरजच झालीये. ह्या ब्लॉगने मला खूप काही दिलंय. माझी Identity मिळाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बक्षिस मिळावं ह्यासाठी हा अट्टाहास कधीच नव्हता पण बक्षिस मिळालं असं कळल्यावर अगदी मनापासून आनंद झाला एवढं मात्र खरं >>>>>> सत्यवचन!
जयश्री,
तुला स्वतःची ओळख मिळाली हे अनुदिनी लिहिण्याचे खरेखुरे पारितोषिक.
स्टार माझाने केलेली निवड, म्हणजे त्या ओळखीला दिलेली केवळ मान्यता आहे.
ज्या परिस्थितीत तुम्ही लोकांनी “रुजवू मराठी, फुलवू मराठी” म्हणत आपल्या मातृभाषेचा महिमा वाढवलात, त्याचा पुरेसा आदरही करणेही मुख्य मराठी भूमीतील मान्यवरांना आजवर साधले नव्हते. किमान त्याची आज भरपाई झाली आहे असे मला वाटते.
तुझे मनापासून अभिनंदन.
अनुदिनी हे आपल्यासारख्या लोकांना मिळालेले अभिव्यक्तीचे अमोघ अवजार, आपण आपणा सर्वांच्या आणि मातृभाषेच्या उन्नतीकरताच वापरू तर बरे.
स्नेहांकित
नरेंद्र गोळे
गोळेकाका…….किती छान कौतुक केलंत …!
मनापासून धन्यवाद 🙂
तुमचंही कौतुक करायलाच हवं. फार वेगवेगळे विषय हाताळताय तुम्ही. तुमचा ब्लॉग वाचनीय तर आहेच पण खूप काही शिकवणाराही आहे. तुमचंही अभिनंदन 🙂
abhinandan!!!
खूप खूप धन्यवाद 🙂
वाह वा !! क्या बात है !! बहुत बढिया !! बधाई हो !!
काल परवाच तुमचा ब्लॉग पहिल्यांदा पाहिला आणि लगेच ही आनंदाची बातमी !
धन्यवाद विकास 🙂
स्टारमाझा पारितोषिकाबद्दल हार्दिक अभिनंदन! Santosh & Sangeeta
संतोष,संगीता…………. तहे दिल से शुक्रिया 🙂
अभिनंदन!
धन्यु गौरी 🙂
abhinandan!! khup kautuk vatta.. tuza tu chand mhahnun lihayla survat keli aata chan shi lekhika navarupala yete aahe…protsahan par ha star maza cha puraskar ….:)
शुक्रिया जानेमन 🙂
वर्षा , तुम्हा लोकांचं प्रोत्साहन, कौतुक आहे माझ्यासोबत म्हणूनच मी आतापर्यंत जे काय केलं ते करु शकले. तुम्हा लोकांशिवाय हे सगळं अशक्य होतं गं !
मी खूप नशीबवान आहे…. तुमच्यासारखी इतकी भरभरुन प्रेम करणारी माणसं मला मिळाली … !! देवाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत !!
अभिनंदन!
धन्यु राजश्री 🙂
नमस्कार, मी अद्वैत. मी आपला ब्लॉग स्टार माझाच्या उत्तेजनार्थ यादित पाहिला मनापासून अभिनंदन. छान ब्लॉग लिहिता आपण! तसेच “सहजच” वर आपल्या ब्लॉगचा संदर्भ मिळाला म्हणून इथे आलो! मी तिथे एक पोस्ट लिहिली होती तिच इथे जोडतोय!
माला आपल्याशी संपर्क साधायचा होता पण कोठेच संपर्कासाठीची माहिती दिसली नाही म्हणून इथे लिहित आहे. कृपया राग मानू नये!
मी व आमच्या काही सहकार्यांनी मिळून मराठी ब्लॉगर्सना एकत्र करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.(केवळ ब्लॉगर्स असे नाही तर कोणीही join होऊ शकतो.) त्याला आम्ही “मराठी कॉर्नर” असे नाव दिले आहे. कॉर्नर का तर आम्ही मराठी म्हणून इतर भाषांचा तिरस्कार करत नाही हे दाखवायचे आहे. कारण जर स्वतःच्या आईचा मान राखत असू तर म्हणून दुस~याच्या आईचा अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असो, मुळ मुद्दा असा की मी आपल्याला मराठी कॉर्नरवर येण्याचे निमंत्रण देत आहे. आपल्या येण्याने निश्चितच आम्हाला आनंद होईल. आत्ता पर्यंत जवळ जवळ ८० ब्लॉगर्स जोडले गेले आहेत आणि हळू हळू का होईना पण विविध विषय मांडले जात आहेत. आपणही जरूर यावे व आपले विचार इतर ब्लॉगर्सशी मांडावेत ही आमची ईच्छा!
आशा आहे आपण आमच्या निमंत्रणाला मान देऊन मराठी कॉर्नरच्या परिवारात सामिल व्हाल.
मराठी कॉर्नर:http://www.marathicorner.com
तसेच आपण आपला ब्लॉग आमच्याशी जोडूही शकता:
http://www.marathicorner.com/memberblogs/
कळावे!
आपला विश्वासू,
अद्वैत
धन्यवाद अद्वैत 🙂
मला सहभागी व्हायला नक्की आवडेल.
अभिनंदन!…
avadala blog tumacha…
मनापासून धन्यवाद पद्मश्री 🙂