काल “साम टिव्ही” बघतांना एक सुखद धक्का मिळाला. “मधुरा” ह्या साम टिव्हीवरच्या प्रसिद्ध कार्यक्रमाची जाहिरात दाखवत होते. स्मिता गवाणकर स्वप्निल बांदोडकरांची मुलाखत घेत होत्या आणि अचानक तो “आभास चांदण्याचा” हे मी लिहिलेलं गाणं गायला लागला. आई गं…आनंदाने ओरडलेच 🙂 एक दोन ओळीच त्याने गायल्या पण मी मात्र तेवढ्याने सुद्धा जमिनीच्या दोन बोटं वर तरंगायला लागले.
अभिजीत राणे नं संगीतबद्ध केलेलं हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे. माझ्या “सारे तुझ्यात आहे” ह्या अल्बमचं ते शिर्षक गीत आहे. स्वप्निल ला ते गाणं गावंसं वाटलं…त्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता करावीशी वाटली याचाच मनापासून आनंद होतोय.
स्वप्निल बांदोडकर ला कल्पनाही नसेल की त्याने त्या फक्त दोन ओळी गाऊन मला किती आनंद दिलाय. तहे दिल से शुक्रिया स्वप्निल 🙂
ही ती साम टीव्हीवरची क्लिप.
जयश्रीताई गाण अप्रतिम आहे….स्वप्नीलने गायलाही सुंदर आणि अभीजीतदादाच संगीत …शब्दच नाहीत माझ्याकडे .
गौरी…….लगेच आणि इतकी आवर्जून प्रतिक्रिया दिलीस………खूप छान वाटलं…….धन्यु 🙂
समजू शकले जयु…:) ग्रेट मोमेंट
श्यामली…….!!!!!!
मस्त वाटलं गं….!! तू माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी असतेस …. माझ्याइतकीच involved असतेस. तहे दिल से शुक्रिया यार 🙂 I know u r always there !!!!!
hiiiii ata hayse vatle na! khup khup abhinandan!
अभिजीत…… हो रे…!! तुझं पण खूप खूप अभिनंदन 🙂 आणि तुझे मनापासून आभार …..!!
तसे तर साम टीवी वर बघायला नाही मिळाली ती मुलाखत पण इतके जरी ऐकले तरी मस्तंच वाटतंय.. खुप खुप अभिनंदन जयू… तुम्ही काय बॉ…. एकदम SSSS…. मग काय विचारता.. मस्तं वाटलं…
धन्यु दीप्स 🙂
तुझ्या कौतुकाची इतकी सवय झालीये ना……. !! कौतुक कसं करावं हे तुझ्याकडून शिकायला हवं ……!! तहे दिल से शुक्रिया 🙂
ग्रेट मोमेंट. 🙂
धन्यवाद गंगाधर जी 🙂
poorna gane kuthe aikayla milel?
विकास…..हे गाणं तुम्हाला ह्या लिंकवर ऐकता येईल.
http://www.maanbindu.com/new-marathi-music-album-Sare-Tuzyat-Aahe
great! abhinandan.tumach kay bua !
शीतल…… मनापासून धन्यवाद 🙂
wow..I am sure its always going to be memorial and special moment for you..COngrats..
अपर्णा…. अगदी खरंय तुझं 🙂 धन्यु 🙂