Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च, 2021

दिल तो पागल है यारो समझा करो
थोडा घायल है यारो समझा करो

जश्न है जिंदगी कभी, कभी चुप है
इश्क दाखिल है यारो समझा करो

दिल ने समझा के प्यार है उनको
दिल तो जाहिल है यारो समझा करो

ख्वाबों में अब तो खनक होने लगी
उनकी पायल है यारो समझा करो

उनकी नजरोंके तीर दिल पे चले
इश्क कातिल है यारो समझा करो

इश्क में हम भी तो बरबाद हुए
वरना काबिल है यारो समझा करो

जिंदगी कितनी खूबसूरत है
वो भी शामिल है यारो समझा करो

जयश्री अंबासकर

Read Full Post »

Teaser

Read Full Post »

Read Full Post »

वृत्त – विधाता
मात्रावली – २ ८ ४, २ ८ ४

एकांत जीवघेणा

ती वाट पाहते दारी, तो उशीर करतो भारी
ती होते मग हिरमुसली, तो नेतो हसण्यावारी
नसते का त्याची सुद्धा,  तेवढीच जिम्मेदारी
बाहेर जाउया म्हणतो, मग यावे वेळेवारी

ठरलाच किती दिवसांनी, हा बेत कालचा नाही
ती तयार होउन बसते, तो लवकर येतच नाही
का उशीर झाला त्याला, मग विचार काही बाही
पण नसते पर्वा त्याला, चुकले न वाटते काही

राखावी त्याने मर्जी, कधि त्यालाही वाटावे
राखावी त्याची मर्जी, का तिलाच हे वाटावे
का त्याने ना समजावे, का तिनेच समजुन घ्यावे
का त्याला हे न कळावे, दोघांनी समजुन घ्यावे

तो कमावतो अन भक्कम, आधार घराला देतो
ती घरात राहुन अपुले, सर्वस्व घराला देते
त्याचे चुकते कि तिचेही, की तकलादू हे नाते
कारण छोटेसे घडते,  पण सारे बिनसत जाते

डोक्यातिल विचारभुंगा, नात्यास पोखरत जातो
नात्याचे ओझे होते, नात्यास अर्थ ना उरतो
संवाद एकमेकांचा, कायमचा थिजून जातो
एकांत जीवघेणा तो,  मग भकास केवळ उरतो.


जयश्री अंबासकर

तुम्हाला ही कविता माझ्या आवाजात ह्या लिंकवर ऐकता येईल आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की Like, Subscribe आणि Share करा !!

Read Full Post »

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: