Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘आमचा ससुला’ Category

कधीतरी तू यावे अवचित चकीत व्हावे मी
तुला पाहुनी माझ्या शशुल्या खुशीत यावे मी

आईचा मग हात सोडुनी दुडुदुडु धावत तू
मला बिलगुनी करत रहावे “आज्जी-आज्जी” तू

किलबिलता मग तुझाच वावर बघत रहावा मी
तुझ्या बाललीला बघताना रंगुन जावे मी

तुझा खाउ अन तुझी खेळणी, तुझ्या हवाली मी
हरखुन जाणे तुझे राजसा निरखत राहिन मी

टपोर डोळ्यातील कुतूहल कसे टिपावे मी
तुझे निरागस हसणे रुसणे जपत रहावे मी

असाच मी अनुभवत रहावा वावर लडिवाळ
खडीसाखरी बोबडबोली नजर खोडसाळ

काळ जरासा थांबुन जावा तुझ्यासोबतीचा
रोज रोज हा उत्सव व्हावा असाच जगण्याचा

स्वप्नरंजनी किती रमावे भानावर येते
“आज्जी” म्हणुनी तुझी हाक अन कानावर येते

तुझी आज्जी 🤗🥰

Read Full Post »

अहान… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद !! खूप मोठ्ठा हो…. !! खूप मज्जा कर… !!

तुझ्या गंमतीजमती ह्या व्हिडियोत बघताना तुला खूप मज्जा येणारे… !!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

काव्य आणि सादरीकरण – आज्जी – जयश्री अंबासकर

व्हिडियो आणि ओरीजनल बॅकग्राऊंड म्युझिक – मामू – अद्वैत अंबासकर

Read Full Post »

माझी दायली (1)

आज मी दहा दिवशाचा झालोय बलं का… !!

मी खूप शहाणा मुग्गा आहे माझ्या आई बाबांचा 🥰

आज किनई लात्री खूप पाऊश आला.
मला खूप थंदी वाजत होती. म्हणून आज्जीनी मला मऊ मऊ ब्लँकेट मधे घत्त लपेतून घेतलं. मग मला खूप गाढ झोप लागली.

आता माझी चोलू आज्जी आलीये. ती मला मश्तपैकी मालिश कलून देनाले…नाऊ नाऊ कलून देनाले… मग मी झोपनाले… टाटा..👶💕

Read Full Post »

%d bloggers like this: