Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘गझल’ Category

जिंकण्याने सतत मी बेजार हल्ली
वाटते घ्यावी जरा माघार हल्ली

थांबले दिसते तुझे लढणेच आता
हारण्याचा थेट की स्वीकार हल्ली ?

संपली नाही लढाई जीवनाची
केवढे बोथट तुझे हत्यार हल्ली

शांतता आहे खरी की भास आहे
होत नाही कोणताही वार हल्ली

लागते रात्री सुखाची झोप आता
ना लढाई, ना चढाई फार हल्ली

मेळ झाला थांबला संहार हल्ली
जीवनाला देखणा आकार हल्ली

जयश्री अंबासकर

Read Full Post »

चुस्त लम्हें जिंदगीके खो गये जाने किधर
सुस्त सी खामोशियों में सिर्फ यादोंके भंवर

चंद बादल आसमां मे फिर भी था ऐसा असर
रोशनी सूरज की मेरे खो गयी जाने किधर

दूर तक कोई किनारा, अब भी ना आता नजर
डूबती कश्ती में कैसे, खत्म होगा ये सफर

सुबह की ना ताजगी है, रात को ना हमसफर
अब तो हिस्से में पडी है सिर्फ सूनी दोपहर

शोरगुल भी था कभी पर, अब तो जीवन  खंडहर
बस है सन्नाटों में लिपटे, सर्द से शामो सहर

जयश्री अंबासकर

You can listen this गझल on the link below

Read Full Post »

वृत्त – अनलज्वाला
मात्रा ८ ८ ८

वणवण फिरुनी, धावुनि दमतो संध्याकाळी
दिवस उसासे टाकत असतो संध्याकाळी

थकून वारा निपचित असतो संध्याकाळी
कधी विरक्ती घेउन फिरतो संध्याकाळी

दिवसभराची दिनकर करतो वेठबिगारी
दमून सुटका मागत असतो संध्याकाळी

निशेस येण्या अवधी असतो अजुन जरा अन्
दिवसच हातुन निसटत असतो संध्याकाळी

विचार भलता येतो कायम कातरवेळी
मनास विळखा घालुन बसतो संध्याकाळी

चुकाच केल्या आजवरी का वाटत असते
उगाच शिक्षा भोगत बसतो संध्याकाळी

भरकटलेले गलबत माझे सावरतो मी
नवा किनारा शोधत फिरतो संध्याकाळी

नव्या दमाने खेळत असतो रोज सकाळी
पुन्हा तसाच पराजित असतो संध्याकाळी

चराचराच्या नश्वरतेचा जागर होतो
तनमन सारे व्याकुळ करतो संध्याकाळी

प्रसन्न करतो देवघरातुन सांजदिवा मग
मनास उजळत तेवत असतो संध्याकाळी

जयश्री अंबासकर

खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला माझी गझल माझ्या आवाजात ऐकता येईल.

Read Full Post »

आसवांचा कोणता व्यवहार झाला
अन सुखाचा केवढा भडिमार झाला

बोलली ती हसुन थोडी मोकळी अन
जग म्हणाले “काय हा व्यभिचार झाला”

नववधूचे हाल केले खूप त्याने
होय त्याचा तो अता अधिकार झाला

श्रेष्ठ कुठला देव ह्याचा वाद होता
त्याच मुद्द्यावरति हिंसाचार झाला

एकदा त्याने भितीने साथ केली
अन गुन्ह्याचा खुद्द भागीदार झाला

जयश्री अंबासकर
११ मार्च २०२१

Read Full Post »

%d bloggers like this: