Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘चित्रपट’ Category

maxresdefault

PIKU….. A lovable Movie 🙂

The Lead actors Amitabh, Deepika n Irrfan played their roles so naturally.

The most important role was of Dialogue Writer. Full marks to her. For every situation, the dialogues were so perfect n hilarious…… that the whole Theater goes wild with laughter 🙂

Even the story…… The Writer Ms.Juhi must have been convinced so much about how every character will react to each situation thats why every seen, every frame looks live n very natural.

The irritating father n a very moody but very caring daughter n some cute characters in their life…. !! Only these many people give you full satisfaction.

Maushmi Chatterji is damn cute in her role. Nice to see her after so many years.

A “Not to miss” Movie I must say 🙂

Advertisements

Read Full Post »

Finding Fanny

FF-Exclusive

“Finding Fanny” ….. just loved it !! Enjoyed thoroughly !!
Hats off to the DIRECTOR Homi Adjania… the way he has handled Goa, Nasiruddin, Pankaj Kapoor, Dimple n Deepika !!
Such a short n sweet story … but these actors make it so convincing !!
The right n well placed humor reminds Basu Chatterjee n Hrishikesh Mukharjee of our times 🙂 
Deepika Looks so Cute….just cant get eyes off her n her Dimples…. no words 🙂 
Nasir n Pankaj ……..ahaa…… Treat to watch !!
The exit of Pankaj Kapoor is so shocking at the same time was very much required. That was fully Directors Moment !!
Dimple is perfect for her role but looks Voluptuous !!
Overall …….. 100 minutes of full entertainment निखळ, निर्मल आनंद 🙂 
Dont miss….. !!

Read Full Post »

Highway

884574_472294599502362_1017225243_o

 आज इम्तियाज अलीचा “Highway” सिनेमा बघितला. इम्तियाज अलीचे जवळपास सगळेच सिनेमे आवडल्यात जमा होते. पण हा सिनेमा बघून इम्तियाजला आवडत्या दिग्दर्शकांच्या रांगेत आवर्जून आणि सन्मानाने बसवलं !

सिनेमा मनापासून आवडेश 🙂 मुख्य म्हणजे आलिया भट प्रचंड आवडेश 🙂 आहे ना गंमत. अगदी हा सिनेमा बघेपर्यंत आलिया भट म्हणजे एक अतिशय बिनडोक, लाडावलेली आणि Over rated मुलगी असा पक्का समज होता. म्हणजे तिला अभिनेत्री म्हणायला सुद्धा नको वाटायचं. पण हा सिनेमा बघून कुछ तो जरुर बदला है ! फार लोभस आणि गोंंडस दिसलीये ती आणि हो…..अभिनय सुद्धा फार सहज केलाय तिनं. अतिशय Convincing वाटावा असा अभिनय इम्तियाज नं तिच्याकडून करवून घेतलाय असं म्हणा हवं तर. काही काही प्रसंग मस्त जमून आलेत. पण ते बघायलाच हवेत. असे सांगता नाही येणार.

रणदीप हुडा……..उच्च !! फार कमी संवाद आलेत त्याच्या वाट्याला पण केवळ expressions ने ह्या माणसानं कमाल केलीये.

संयत अभिनय, मोजकेच पण परिणामकारक संवाद…. ह्यामुळे चित्रपट कृत्रिम न वाटता खराखुरा वाटतो.

लोकेशन्स सुरेख आहेत. आपल्या भारतातही इतकी छान लोकेशन्स आहेत यार !!

आलिया भट, रणदीप हुडा आणि इम्तियाज साठी हा सिनेमा एकदा नक्की बघायला”च” हवा 🙂

FT1

Read Full Post »

aajacha_divas_majha_ver4

“आजचा दिवस माझा” अप्रतिम सिनेमा !!
जबरदस्त स्टारकास्ट !

अफलातून दिग्दर्शन !!

कितीतरी दिवसात इतका सुरेख सिनेमा बघितला.

सचिन खेडेकर ……..तुस्सी फिर से छा गये बॉस !! कडक सॅल्यूट !!

सिनेमातले काही काही Scenes केवळ अप्रतिम !!

पीडी (ऋषिकेश जोशी) आपल्या मुलाशी बोलतो ते संभाषण !! सुरवातीला चिडलेला मुलगा बाबांचं बोलणं ऐकून कसा हळुहळु निवळत जातो ते केवळ पडद्यावरच बघायला हवं.

मुख्यमंत्री बनल्यानंतर विमानतळापासून तर सिनेमात शेवटपर्यंत सचिनचा रुबाब…… खासच…… !! कमालीचा देखणा दिसतो सचिन.  अंध गायकाचा आपल्याकडून झालेला अपमान …..त्यानंतरची होणारी तगमग बघून आपण सुद्धा अस्वस्थ होतो.

अश्विनी भावेनी सुद्धा फार सुरेख बजावलीये भूमिका. सही दिसते !!  नवर्‍याच्या पदाला साजेसा आब, समजूतदारपणा अतिशय बेमालूम साकारलाय !!

सुहास परांजपे, तिचा झालेला नवरा, लिना भागवत, महेश मांजरेकर, आनंद इंगळे, एकापेक्षा एक.

इतक्या रात्री मंत्रालयात बोलावलंय हे कळल्यानंतरच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यालायक.

सुहास परांजपे जेव्हा आनंद इंगळेंशी नवर्‍याबद्दल खोटं बोलते तो scene तर एकदम झकास जमलाय ….!

ऋषिकेश जोशी अविस्मरणीय भूमिका ….एकदम संयत आणि वास्तविक.

Overall……..एक जबरी सिनेमा !!

Read Full Post »

Jolly_LLB_First_Look (1)

काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं.  तसा आज सिनेमा बघूनही झाला.   आवडला !!

एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच !  कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर.  नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !!  सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय.  अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी.  पण तरीही काहीतरी वेगळं होतं !!

मला वाटतं, सिनेमा ज्या सहजतेने पुढे सरकत जातो त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच समजत असूनही आपण पुढे काय होणार ह्याची वाट बघतो.  कुठलाही कृत्रिम प्रयत्न किंवा कुठलेही स्टंट्स, कुठलेही चित्रविचित्र प्रसंग न दाखवता नेहेमी आपल्या आजूबाजूला घडणारे प्रसंग दाखवल्यामुळे चित्रपटातल्या घटनांशी आपण एकरुप होऊ शकतो.  विनोदी झालर असूनसुद्धा काही प्रसंग अंगावर येतात.  समाजातल्या जळजळीत वास्तवाची जाणीव झाल्यावर अस्वस्थ व्हायला होतं.

ह्या सिनेमात दाखवलेलं कोर्टातलं वातावरण  हे ह्या आधी मी कुठल्याच सिनेमात बघितलं नव्हतं.  एकीकडे काही वकीलाचं बिचारेपण, अगतिकता  तर दुसरीकडे यशस्वी वकीलांची मुजोरी, arrogance !! हा विरोधाभास फार सुरेख दाखवलाय.  परीट घडीचा चेहेरा असलेले जजच आपण आतापर्यंत सिनेमात बघितले असल्यामुळे सौरभ शुक्लाचा थोडा मिश्कील, थोडा गबाळग्रंथी जज बघतांना मजा आली.

सौरभ शुक्ला ने केलेला जज मात्र काबिल ए तारीफ !! त्याची शरीरयष्टीच अर्ध काम करुन जाते.  एक अतिशय महत्वाची भूमिका त्याच्या वाट्याला आलीये आणि त्याने त्याचं सोनं केलंय.

अर्शद वारसी एक चांगला अभिनेता आहे.  फार भूमिका नाही मिळाल्या त्याला पण ज्या काही भूमिका त्याला मिळाल्या त्यात त्याने त्याची छाप नक्कीच सोडली.  ह्यातही त्याने सुरेख काम केलंय.  तो नायक आहे पण सुपर हिरो नाही.  एक सर्वसामान्य वकील, ज्याची वकीली अजिबात चालत नाही.  पैशासाठी तो पोलीसांनी पकडलेल्या दहशतवाद्याची भूमिका सुद्धा करायला तयार होतो.   प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी करायचं म्हणून तो एक बंद झालेली केस पुन्हा उघडतो आणि  नंतर विरुद्ध पक्षाच्या प्रसिद्ध वकीलाने दिलेली लाच स्वीकारुन गप्प बसतो.  जेव्हा त्याची मैत्रिण, साथीदार त्याला दोष देऊन त्याचे डोळे उघडतात…… तेव्हा तो त्या प्रसिध्द वकीलाला आव्हान देऊन त्याच्यापुढे दंड ठोकून उभा राहतो.

सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो बमन इरानी.  एक जबरदस्त ताकदीचा कलाकार !! माझा अतिशय आवडता अभिनेता !! प्रत्येक भूमिकेत तो अगदी खोलवर  शिरतो.    मग त्यात अगदी कणभर सुध्दा बमन इरानी उरत नाही.  तो भूमिका जगतो.  ह्या चित्रपटात तो एका अतिशय यशस्वी, Arrogant, कोर्टाला स्वत:चीच मालमत्ता समजणारा, अतिशय shrewd वकीलाची भूमिका साकारतो.  त्याच्या हालचाली, त्याच्या चेहेर्‍यावर कायम असणारे बेदरकार  आणि बेरकी भाव,  मीच सगळ्यात हुशार आणि बाकी सगळे एकजात मूर्ख ही प्रौढी हे सगळं इतकं सहज दाखवलंय ना की आपण मनोमन त्याला दाद देऊन जातो.  पुन्हा एकदा बमन इरानीला एक कडक सॅल्यूट !!

काही सीन्स अप्रतिम आहेत.  जेव्हा अर्शद वारसी बमन इरानीच्या ऑफीस मधे बॅग ठेवून निघुन जातो.  बमन ती बॅग उघडून बघतो तेव्हा त्यातून उंदीर निघतात.  ते बघून बमनला बसलेला शॉक !! आता तुझा डोलारा मी पोखरणार ही अर्शद वारसीची थंड धमकी !!  शेवटच्या सीन मधे सौरभ शुक्लाने बमनची केलेली कान उघाडणी…..केवळ लाजवाब !! मजा आ गया !!

आपल्या रमेश देव आणि मोहन आगाशेंचं दर्शन सुद्धा सुखावह होतं 🙂 रमेश देवांचं ह्या वयातही ताठ चालणं बघून खूप छान वाटतं. दोघांचेही फार कमी संवाद आहेत पण एकदम जबरी !!

गाणी खरं तर नसती तरी चाललं असतं.  फक्त एक ते दारु पिण्याचं गाणं सोडून बाकी १-२ गाणीच आहेत जी सिनेमाला अजिबात बाधा आणत नाहीत.  उलट साजेशी साथ देतात.

एक चांगला सिनेमा बघितल्याचं समाधान मिळतं पण हे समाजातलं वास्तव आहे हे जेव्हा जाणवतं तेव्हा अंगावर काटा येतो.  कायदा आणि पोलीस हे सामान्य लोकांसाठी कधी काम करणार…. ह्या प्रश्नाने जीव कासाविस होतो.   अगदीच रामराज्याची कोणीच अपेक्षा करत नाही पण पोलीस आणि कायदे ह्यांचा सामान्य माणसाला थोडा तरी आधार वाटायला हवा.

मनातल्या निद्रिस्त जाणीवा जागवणारा हा चित्रपट मला तरी आवडला !!

Read Full Post »

आघात

काल जीवाला अजिबात चैन नव्हती…….मन कशातच लागत नव्हतं.  काही वाचायला सुद्धा शांत मन नव्हतं….. जीवाची उलाघाल होत होती.  अशातच “आघात” हा सिनेमा बघितला.  मनाच्या अशा अवस्थेत बघितल्यामुळे का काय……..सिनेमा अक्षरश: अंगावर आला.

एक अतिशय निर्लज्ज, नीच माणूस फक्त आणि फक्त आपल्या इगोसाठी, पैशासाठी निष्पाप लोकांच्या आयुष्याशी खेळतो…… स्वत:च्या हट्टापायी अनेक लोकांची आयुष्यं उध्वस्त करतो, ते ही निगरगट्टपणे….. कुठलाही गिल्ट न ठेवता.  विक्रम गोखल्यांची अशा या नराधम डॉक्टर खुरानाची भूमिका अंगावर काटा आणते.  या खुरानाची इतकी चीड येते की त्याक्षणी त्या माणसाला गोळ्या घालाव्याशा वाटतात.

संगीता प्रधान…..एक गोड तरुण मुलगी, जेमतेम एका महिन्यावर आलेलं लग्न…..डोळ्यात खूप सारी स्वप्नं….स्वप्नातल्या राजकुमाराशी ठरलेलं लग्न…….आणि अचानक तिच्या आयुष्याची झालेली मोडतोड….तिच्यावर लादण्यात आलेलं वांझपण…….परिस्थिती कळल्यानंतर तिला बसलेला धक्का, होणार्‍या नवर्‍याचं जाणवलेलं खरंखुरं प्रेम….. ढळलेला मानसिक समतोल ह्या सगळ्या अवस्था अतिशय परिणामकारक मांडणारी कादंबरी कदम………….लाजवाब !!

आणि मुक्ता बर्वे…….. काय बोलावं ह्या मुलीबद्दल……!! आपण तर तिच्यावर एकदम फिदा !!  कसला अभिनय करते ही…….. अभिनय कसला….. एकेक भूमिका चक्क जगते ती !! जोगवा असो की पुणे-मुंबई-पुणे असो….. की आघात…….. ही आपली त्या त्या भूमिकेत अगदी फिट्ट !! डोळे तर असले बोलके की असं वाटतं आत्ता शब्द बाहेर पडतील….डोळ्यातूनच !! संगीताशी बोलतांनाची हळवी स्मिता, आपल्या सच्च्या निर्णयाशी ठामपणे कायम राहणारी स्मिता, डॉक्टर प्रियकराला समज देणारी परखड स्मिता, आपल्या मित्र असलेल्या डॉक्टर बुधकर ने तिला समजून न घेता तिच्या विरुद्ध साक्ष दिल्यानंतरची विद्ध झालेली स्मिता….. तिच्या लढ्यात अचानक एकटं पडल्याची जाणीव झाल्यानंतरची आईशी बोलणारी व्याकुळ स्मिता……. कमाल………….फक्त कमाल केलीये मुक्ता बर्वेनी !!

डॉक्टर म्हणजे देवच………ह्या समीकरणावर मनापासून विश्वास असलेल्या लोकांचे डोळे खाडकन उघडणारी ही कथा……. कित्येक ठिकाणी प्रत्यक्षात घडतेय.  अशा माणुसकीला काळिमा फासणार्‍या डॉक्टरांना शासन जर करायचं असेल तर एका सामान्य माणसाच्या हातात काहीच नसतं हे प्रकर्षानं जाणवलं.  पण स्मिता देशमुख सारखी त्यांच्यातलीच जिवंत मन असलेली डॉक्टरच खूप काही करु शकते हे ही कळलं.

आवर्जून बघावा असा चित्रपट !

एक परिपूर्ण…..अप्रतिम कलाकॄती……..!!

Read Full Post »

आज “सुखांत” हा एक अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट बघितला.

चित्रपटाची कथा अतिशय वेगवान आहे. किरण यज्ञोपवित ह्यांची कथा मनावर बराच वेळ आपलं अधिराज्य गाजवत राहते आणि आपण सुन्न होऊन जातो.  संजय सूरकरांचं अप्रतिम दिग्दर्शन आणि ज्योती चांदेकर, अतुल कुलकर्णी आणि कविता लाड चा नितांत सुंदर अभिनय ह्यामुळे हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जातो.  ज्योती चांदेकरांनी तर फक्त चेहेर्‍यावरच्या हावभावांनी बाजी मारुन नेलीये.  अगतिकता त्यांच्या डोळ्यातून इतक्या प्रभावीपणे व्यक्त होते की त्याची तीव्रता आपल्यालाही अस्वस्थ करते.

अगदी आपल्या आजूबाजूला घडणारं कथानक.  आई खंबीरपणे एकटी मुलाला वाढवून मोठा वकील बनवते.  स्वत:सोबतच अनेक बायकांना रोजगार मिळवून देऊन मानानं जगायला शिकवते.  एका छोट्याशा अपघातात मणक्याला मार बसून कायमची पंगू होते.  फक्त बोलू शकते, ऐकू शकते बाकी सगळं परावलंबी जगणं वाट्याला येतं.  काही दिवस काय झालंय हे समजण्यातच जातात.  पण हळुहळु जेव्हा सत्याची जाणीव व्हायला लागते तेव्हा मात्र त्या अगदीच हबकून जातात.  आपल्या उशा-पायथ्याशी असणार्‍या माणसांचं प्रेम त्यांना समजत असतं पण अशी सर्वस्वी दुसर्‍यांवर अवलंबून राहण्याची अगतिकता त्यांच्याने सहन होत नाही. अशा जगण्याची त्यांना चीड येते.  स्वत:वरच चिडत, संतापत त्या मुलाला दयामरणाची भीक मागतात.  मुलाला, सुनेला ते अजिबात मान्य नसतं.  पण तिची तडफड बघणं अशक्य झाल्यावर मुलगाच कोर्टात याचिका दाखल करतो इच्छामरणाची.  पण माणुसकीच्या नात्याने कोर्ट ती मागणी अमान्य करतं.  मागणी अमान्य झाल्यावर आईची अवस्था मुलाच्याने बघवत नाही आणि तो स्वत:च तिला मरणदान देतो.  मुलाचं आईवर नितांत प्रेम असतं आणि म्हणूनच आपल्या स्वाभिमानी आईला अशा अवस्थेत तो बघू शकत नाही आणि तो या निर्णयाला येतो.

चित्रपटाच्या अंताचा विचार दिग्दर्शकाने प्रेक्षकांवरच सोपवलाय.  कुठलंही न्यायालय इच्छामरणाचा कायदा बनवूच शकत नाही कारण ह्याचा दुरुपयोगच जास्त होऊ शकतो.  त्यामुळे इच्छामरण द्यावं की नाही हा अवघड प्रश्न ज्याचा त्यानेच सोडवावा असं काहीसं दिग्दर्शकाला सांगायचं असावं.

सगळ्याच कलाकारांचा अभिनय उच्च !! कुठेही फापटपसारा नाही, अवास्तव इमोशन्स नाहीत.  सगळंच अतिशय संयत !  त्यामुळे चित्रपटाचा प्रभाव बराच वेळ जाणवत राहतो.

अरुणा शानबाग ह्यांच्या बाबतीत कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तर ह्या चित्रपटाचा शेवट अधिकच भावतो.

एक अतिशय उत्कृष्ठ चित्रपट प्रेक्षकांना दिल्याबद्दल “सुखांत”च्या संपूर्ण टीमचं मन:पूर्वक अभिनंदन !!

 

Read Full Post »

%d bloggers like this: