Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘माझी गाणी’ Category

मी लिहिलेल्या ह्या गणेश वंदनेला मायबोलीवरचा योग, म्हणजेच योगेश जोशी ने अतिशय सुरेल चाल दिलीये.  त्याच्या ” गण गण गणात गणपती” ह्या अल्बम मधे ह्या वंदनेचा समावेश आहे.  ही वंदना सारिका आणि योगेश ने गायलीये.

ही वंदना तुम्ही इथे ऐकू शकता.

मायबोलीच्या गणेशोत्सवात

गणेश वंदना

गजानना तुज वंदन करीतो

भरुनी अंजली सुमनांची

आशीर्वच दे अम्हा मोरया

चरणी प्रार्थना ही अमुची ॥


लडीवाळ हे रुप गोजिरे

प्रसन्न भासे सदा साजिरे

माता अंबा दृष्ट काढिते

सदैव अपुल्या पुत्राची

आशीर्वच दे अम्हा मोरया

चरणी प्रार्थना ही अमुची

अपार लीला तुझ्या गणेशा

सवे रंगसी रिद्धी सिद्धीच्या

नाथ गणांचा तूच शोभतो

चिंता वाही जगताची

आशीर्वच दे अम्हा मोरया

चरणी प्रार्थना ही अमुची

वरद विनायक, करुणागारा

सारी विघ्ने नेसी विलया

सिंदूरवदना, मयूरेश्वरा

करीसी दैना दु:खांची

आशीर्वच दे अम्हा मोरया

चरणी प्रार्थना ही अमुची

पार्वतीनंदन, हे जगवंदन

तिन्ही लोकीचा त्राता भगवन

भवसागर हा तरण्या देवा

नाव हाक तू भक्तांची

आशीर्वच दे अम्हा मोरया

चरणी प्रार्थना ही अमुची

Read Full Post »

%d bloggers like this: