Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘माझी पाककला’ Category

कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात “पाक-कला” स्पर्धा जाहीर झाली.  तीळ हा मुख्य घटक वापरुन पदार्थ तयार करायचे होते.  पिल्लाचं महत्वाचं वर्ष …. त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत ह्या वर्षी भाग घ्यायचा नाही असं ठरवल्यामुळे निवांत होते.  अशातच स्वातीचा फ़ोन आला आणि मी तुझं नाव लिहून घेतलंय आणि तुला भाग घ्यायचा आहे असा प्रेमळ आग्रह झाला….. नाही म्हणताच आलं नाही.

एकदा भाग घ्यायचा म्हटल्यावर विचार चक्र सुरु झालं आणि डोक्यात काय करायचं ह्याचं चित्र हळुहळु स्पष्ट व्हायला लागलं.  तशी तयारी देखील सुरु केली.

स्पर्धेचा दिवस उजाडला.  सगळं साहित्य घेऊन वेळेवर पोहोचलो आणि मनासारखी मांडणी झाली.  कार्यक्रम सुरु झाला आणि बक्षिस जाहीर झालं 🙂

तीच माझी पाककृती इथे शेअर करतेय.

IMG-20130202-WA0001

IMG-20130202-WA0004

IMG-20130202-WA0003

IMG-20130202-WA0008

साहित्य :

१. तीळ – अर्धा किलो
२. गूळ – अर्धा किलो पेक्षा थोडा कमी
३. डिंक बारीक तुकडे – ५ टेबल स्पून
४. जाड पोहे – अर्धी वाटी
५. वेलदोड्याची पूड – १ टीस्पून
६. तूप

कृती :

१. तीळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घेतले.
२. मग तीळ मस्त खमंग, गुलाबीसर रंगाचे होईस्तोवर भाजून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेतले. मिक्सरमधे बारीक करतांना थोडा वेळ जास्त फिरवलं त्यामुळे तीळाचं छानपैकी तेल निघून तीळाचा ओलसर गोळा झाला.
३. गूळ बारीक किसून घेतला.
४. तूपात डिंक आणि पोहे फुलवून घेतले.
५. मग तीळाचं कूट, गूळ , तळलेला डिंक, तळलेले पोहे, वेलदोड्याची पूड हे सगळं एकजीव केलं.
६. गोल आकार देऊन वर हलवा लावून “दिलखुश क्रंची बॉल्स” तयार केले.

सजावट :

१. आधी बारीक नूडल्स वाफवून घेतल्या. मग एका छोट्या चाळणीत त्याला बाऊल सारखा आकार देऊन तेलात तळून घेतलं. चाळणीतून बाहेर काढल्यावर तयार झालं घरटं.
२. वरच्या “दिलखुश क्रंच” चे चपटे ओव्हल गोळे बनवले. त्यावर लवंगीचे डोळे, पिस्त्याच्या कापाचे नाक आणि बदामाच्या कापाचे ओठ केले. बेकींग कप्स ची टोपी करुन ती टूथपीक ने प्रत्येक गोळ्याच्या डोक्यावर घातली. आधी तयार केलेल्या घरट्यात ही गोजिरवाणी बाळं ठेवली.
३. एका ट्रे मधे माती घालून त्यात मूग, मोहरी पेरली. हे झालं घराचं अंगण. त्यावर फुलांचे वाफे आणि मिर्च्यांचं कुंपण तयार केलं. अंगणात नूडल्सचं घरटं आणि घरट्यात “दिलखुश” गोजिरवाणी बाळं !!!

Advertisements

Read Full Post »

“आई, मस्त चिकन बनवशील का आज ?” ्पिल्लाचं आर्जव…… तेही त्याच्या वाढदिवसाला……!! मग ते न बनवून कसं चालणार… !!  इकडे तिकडे थोडं सर्च करुन,  घरी असलेल्या वस्तू वापरुन मस्त रेसिपी तयार झाली.”मूर्ग हैदराबादी”.

DSC02197

साहित्य :

मॅरिनेशन :

चिकन – १ किलो
दही – १ कप
तिखट – २ टी स्पून
मीठ – १ टी स्पून
लिंबाचा रस – २ टी स्पून

ग्रेव्ही :

बारीक चिरलेला कांदा – २ कप
लसूण पेस्ट – १ टेबल स्पून
कोथिंबीर – अर्धा कप
पुदीना – अर्धा कप
हळ्द – १ टी स्पून
तिखट – १ टी स्पून
गरम मसाला – २ टी स्पून
मीठ – चवीनुसार
तळलेले काजू १०-१२
तेल – ४ टेबल स्पून

कृती :

१. मॅरीनेशन चं साहित्य चिकनला चोळून चिकन साधारण दीड तास मॅरीनेट करा.

२. कढईत तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर तळून घ्या.

३. मग त्यात लसूण घालून थोडं परता.

४. त्यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घाला.

५. आता त्यात चिकन चे मॅरीनेट झालेले तुकडे घालून परता.

६. मग त्यात अर्धा कप पाणी घालून नरम शिजवून घ्या.

७. शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदीना आणि काजू घालून आणखी एक उकळी काढा.

८. मस्त चमचमीत तयार झालेलं चिकन कोथिंबीर आणि काजूचे तुकडे घालून सर्व्ह करा.  तबीयत खुश होणारच 🙂

पिल्लाने अगदी मनापासून दाद दिली होऽऽऽऽ 🙂

Read Full Post »

काल लग्नाचा वाढदिवस होता म्हटलं नवर्‍यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच.  पण म्हटलं,  आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे.

लग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा(?) मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.

साहित्य : मॅरिनेशन साठी

१ किलो चिकन,
३ टेबल स्पून टोमॅटो केचप,
लिंबाचा रस (साधारण २ लिंबांचा रस)(इकडे मोठी लिंबं रसदार मिळतात. त्यामुळे मी एकच घेतलं.)
२ टी स्पून लाल तिखट
मीठ

साहित्य : ग्रेव्हीसाठी

प्रत्येकी २ टी स्पून आलं, लसूण पेस्ट,
२ टेबल स्पून टोमॅटो प्युरी,
३ कांदे अगदी बारीक चिरुन,
२ अंडी फेटून,
१ टी स्पून हळद
२ टेबल स्पून हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरुन,
१ टी स्पून बादशहा (किंवा कुठलाही) चिकन मसाला
तेल,
मीठ.

कृती :

चिकन स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळवून टाका.
मॅरीनेशन चं सगळं साहित्य एकत्र करुन चिकन ला चोळून ठेवा. साधारण २ तास झाकून ठेवा.
एका कढईत ३ टेबल स्पून तेल तापत ठेवा आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला.
तेल सुटायला लागलं की त्यात आलं, लसूण पेस्ट घाला.
थोडं परतून नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घाला.
मग त्यात हळद आणि चिकन मसाला घाला.
थोडं परतवून त्यात चिकनचे मॅरीनेट केलेले तुकडे घाला.
सगळं मिश्रण मस्तपैकी परतवून झाकण ठेवा.
साधारण १५ मिनिटात चिकन शिजत आल्यानंतर त्यात १ कप पाणी घाला.
पुन्हा झाकण ठेवा आणि चिकन पूर्ण शिजवा.
झाकण उघडल्यावर मस्त रसरशीत चिकन तयार 🙂

पण थांबा पिक्चर अभी बाकी है .. 😉

फेटलेली २ अंडी त्यात घाला. मस्तपैकी ढवळा.
गरम असल्यामुळे अंडी लगेच शिजतील. छान ढवळल्यामुळे अंडी एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील.
रश्श्याचं टेक्स्चर पूर्ण बदलेल पण घाबरु नका.
झाकण ठेवा ….आणखी एक वाफ काढा.
आता चिकन जालफ्रेझी एकदम तय्यार 🙂

एका छानशा भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तोंडाला पाणी नक्कीच  सुटणार 🙂

Read Full Post »

%d bloggers like this: