Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘मराठी चित्रपट’

aajacha_divas_majha_ver4

“आजचा दिवस माझा” अप्रतिम सिनेमा !!
जबरदस्त स्टारकास्ट !

अफलातून दिग्दर्शन !!

कितीतरी दिवसात इतका सुरेख सिनेमा बघितला.

सचिन खेडेकर ……..तुस्सी फिर से छा गये बॉस !! कडक सॅल्यूट !!

सिनेमातले काही काही Scenes केवळ अप्रतिम !!

पीडी (ऋषिकेश जोशी) आपल्या मुलाशी बोलतो ते संभाषण !! सुरवातीला चिडलेला मुलगा बाबांचं बोलणं ऐकून कसा हळुहळु निवळत जातो ते केवळ पडद्यावरच बघायला हवं.

मुख्यमंत्री बनल्यानंतर विमानतळापासून तर सिनेमात शेवटपर्यंत सचिनचा रुबाब…… खासच…… !! कमालीचा देखणा दिसतो सचिन.  अंध गायकाचा आपल्याकडून झालेला अपमान …..त्यानंतरची होणारी तगमग बघून आपण सुद्धा अस्वस्थ होतो.

अश्विनी भावेनी सुद्धा फार सुरेख बजावलीये भूमिका. सही दिसते !!  नवर्‍याच्या पदाला साजेसा आब, समजूतदारपणा अतिशय बेमालूम साकारलाय !!

सुहास परांजपे, तिचा झालेला नवरा, लिना भागवत, महेश मांजरेकर, आनंद इंगळे, एकापेक्षा एक.

इतक्या रात्री मंत्रालयात बोलावलंय हे कळल्यानंतरच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यालायक.

सुहास परांजपे जेव्हा आनंद इंगळेंशी नवर्‍याबद्दल खोटं बोलते तो scene तर एकदम झकास जमलाय ….!

ऋषिकेश जोशी अविस्मरणीय भूमिका ….एकदम संयत आणि वास्तविक.

Overall……..एक जबरी सिनेमा !!

Advertisements

Read Full Post »

%d bloggers like this: