Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘मनातलं…!’ Category

रिश्ता समझदार होने लगा है या नासमझ
दोनों को पता नही, दोनों की खता नही

इस नासमझी को समझने की जरूरत भी नही
चलो अजनबी बनके दोबारा मिलते है कही

जयश्री अंबासकर

Read Full Post »

काल अभिव्यक्ती, वैदर्भीय लेखिका संस्थेचा “४७ वा वर्धापन दिन सोहळा” दिमाखात साजरा झाला. वर्धापन दिनाचं औचित्य साधून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात.

मागच्या वर्षी ह्या वर्धापन दिनाचं सूत्रसंचालन मी केलं होतं. पण पुढच्याच वर्षी पुरस्कारार्थींमधे माझंसुद्धा नाव असेल ह्याची मी अजिबातच कल्पना केली नव्हती. सगळे योग आपोआप जुळून येत असावेत.

कालच्या सोहळ्यात श्रोत्यांमधे नागपूरच्या मोठमोठ्या दिग्गजांची हजेरी होती त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभली. आमच्या लाडक्या विजयाताई ब्राम्हणकरांना “साहित्य सौदामिनी पुरस्कार” मिळाला हीसुद्धा अतिशय आनंददायी गोष्ट होती. डॉ. विभावरी दाणी, सुप्रियाताई अय्यर, विजयाताई या गुरुतुल्य व्यक्तींच्या हस्ते सन्मानित होतांना खूपच आनंद झाला.

माझ्या “चिंब सुखाचे तळे” या काव्यसंग्रहाचा हा दुसरा सन्मान होता. पहिला सन्मान काव्य रसिक मंडळ डोंबिवलीचा “काव्य उन्मेष पुरस्कार” आणि हा अभिव्यक्तीचा “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार”.

पहिल्या पुरस्काराचं अप्रूप काही वेगळंच असलं तरी माहेरी मिळालेला पुरस्कारसुद्धा खूप खूप आनंददायी असतो. तोच आनंद अभिव्यक्तीसारख्या दर्जेदार संस्थेमुळे काल मला अनुभवता आला.

सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे, रश्मीताई वाघमारे, रामचंद्र इकारे…. ह्यांचासुद्धा हृद्य सत्कार झाला.

सुषमा मुलमुलेंच्या सहजसुंदर सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम नेटका झाला. दुसर्‍या सत्रातली रेणुकाताई देशकरांनी घेतलेली डॉ. जयश्री आणि प्रशांत शिवलकर, अपर्णा आणि विष्णू मनोहरांची मुलाखतही छान झाली. कार्यक्रमाची सांगता स्वरुची भोजनाने झाली.

खूप समाधान, आनंद देणारी आणि मनात दीर्घकाळ रेंगाळणारी काही क्षणचित्रं मुद्दाम शेअर करतेय.

Read Full Post »

माझा “चिंब सुखाचे तळे” हा वाचताना ऐकतासुध्दा येणारा काव्यसंग्रह ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी मला What’s App वर संपर्क करा.

गुगलपेवर पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट मला Whats App वर पाठवून आपली नोंदणी निश्चित करा.

पोस्टेजसह मूल्य Rs.250/- (विनामूल्य पोस्टजच्या सेवेचा लाभ मिळवण्यासाठी फक्त काही दिवस बाकी)

● चिंब सुखाचे तळे (कवितासंग्रह)
● कवयित्री : जयश्री कुलकर्णी अंबासकर
● प्रकाशक : संजय शिंदे, अष्टगंध प्रकाशन
● मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
● सुलेखन : डॉ. शिरीष शिरसाट
● अक्षरजुळणी : शिवकुमार
● हार्डबोर्ड पुठ्ठा बांधणी

■ जयश्री कुलकर्णी अंबासकर : 9920422064

#चिंब_सुखाचे_तळे

Read Full Post »

चिटनवीस सेंटरमधे आज एक अप्रतिम कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली. रविंद्र दुरुगकरांच्या संकल्पनेतून साकार झालेला “कलावंतांच्या मनातील मान्यवर” हा कार्यक्रम म्हणजे डॉ.अभय बंग यांना निरनिराळ्या क्षेत्रातल्या कलावंतांनी दिलेला मानाचा मुजराच होता.

अंजलीताई दुरुगकरांनी घेतलेल्या अतिशय सुंदर मुलाखतीच्या दरम्यान सचिन आणि सुरभी ढोमणे यांनी सादर केलेली गाणी, अच्युत पालवांनी केलेलं सुलेखन, विनय चाणेकरांनी काढलेलं caricature, अब्दुल गफारांनी काढलेलं पोर्ट्रेट आणि माझी मैत्रिण Sushama Mulmule सुषमा मुलमुलेने डॉक्टरांवर लिहिलेली सुंदर कविता… अशी भरगच्च मेजवानी होती. डॉ.अभय बंग ह्यांना ऐकणं हा तर नितांत सुंदर अनुभव! सगळे अक्षरशः भारावून गेलो होतो.

पत्रिकेत लिहिलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरू झाला हे आणखी एक वैशिष्ट्य आणि त्यानंतरचे जवळजवळ दोन-सव्वा दोन तास सगळे मंत्रमुग्ध होऊन डॉक्टरांना ऐकत होतो.

अर्थपूर्ण जगणाऱ्या आणि जगायला शिकवणाऱ्या डॉ.अभय बंगांबद्दल आदर होताच, या कार्यक्रमामुळे तो आणखी वाढला. या अंतर्मुख करणाऱ्या अनुभूतीबद्दल आयोजकांचे मनापासून आभार!

Read Full Post »

परवाच्या “अनवट शांताबाई” ह्या कार्यक्रमाची धुंदी अजून ओसरली नव्हतीच आणि आज सकाळी सकाळी फोनवर अनुराधाताईंचा मेसेज… “भेटायला आवडेल…दहानंतर ये”. आई गं… कधी एकदा दहा वाजतात…असं झालं.

फायनली…दहा वाजले आणि मी तरंगतच खाली पोचले. अनुराधाताईंची खास मैत्रिण म्हणजे आमच्या चितळे काकू, आमच्याच बिल्डींगमधे राहतात. त्यांच्याकडे पोचले. बेल वाजवली… प्रसन्नवदना अनुराधाताईंनीच दार उघडलं आणि तिथेच माझी सकाळ सुंदर झाली.

मग भरभरुन गप्पा झाल्या. त्यांच्याकडून भरपूर किस्से ऐकायला मिळाले, मार्गदर्शन मिळालं. त्यांच्यातली ऊर्जा, उत्साह, त्याचं देखणेपण अक्षरशः भुरळ घालतं. आपण तर बुवा पुन्हा त्याच्या प्रेमात… ❤ त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकजण असाच त्यांच्या प्रेमात पडत असणार…. भारावून जात असणार…

खूप जपून ठेवणार आहे मी त्यांच्या सहवासातले हे क्षण!

अनुराधाताई… लव्ह यूऽऽऽ ❤🥰❤

बघा ना… तुमच्यासोबत फोटो घ्यायचा हे ठरवून आलेले पण एक्साईटमेंटच इतकी होती की फोटो काढायलाच विसरले. आता पुढच्या भेटीत आधी फोटो काढूया 😊

Read Full Post »

Older Posts »