Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘ये दुनिया रंगरंगीली’ Category

आतुरतेनं ज्या अंकाची वाट बघत होते तो “अनलॉक” दिवाळी अंक शेवटी हातात आला. लहानपणी नवीन पुस्तकं हातात आली की प्रेमाने त्याच्यावरून हात फिरवायचो…. भरभरून त्यातला वास मनात साठवून घ्यायचो…. तसं झालं अगदी!

आधाशासारखा अंक उघडला… मुखपृष्ठ अगदी नजर खिळवून ठेवणारं. सुरकुत्यांनी सुद्धा इतकं सुंदर कोणी दिसू शकतं… अगदी मनापासून आनंदी असणारी वृद्ध स्त्री इतकी आकर्षक दिसू शकते…! परंपरा रितीरिवाज सांभाळतांनासुध्दा जगण्याचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या स्रीचं प्रतिक! मुखपृष्ठानेच अर्धी बाजी जिंकलीये. पान न पान देखणं… गुळगुळीत… चमकदार… त्यातल्या चित्रांनीच नव्हे तर त्यातल्या शब्द श्रीमंतीनेसुद्धा थक्क झाले. आजवर इतका सुंदर दिवाळी अंक खरंच बघितला नव्हता. फॉन्ट सुद्धा किती प्लिझिंग..! मांडणी, रंगसंगती, चित्रं… हे सगळं बघून हरखायला झालं… आवडत्या गोष्टीची वाट बघून जेव्हा ती हातात पडते त्यावेळी होणारा आनंद आणि “अनलॉक” हातात आल्यानंतरचा आनंद अगदी तोच!

Rashmi रश्मी……. प्रचंड मेहेनत घेतली आहेस गं राणी… ते सुद्धा तब्येत ठीक नसताना… बसता सुद्धा येत नव्हतं तुला नीट. कसं गं केलंस हे सगळं? जाहिराती मिळवणं, लेख, कविता निवडणं… मनासारखी मांडणी, मुद्रितशोधन… केवढी कामं असतात. तुझ्या सगळ्या मेहनतीचं सार्थक झालंय रश्मी. सर्वांगसुंदर झालाय अनलॉक.

ह्या जागतिक प्रथा-परंपरा विशेषांकात माझ्या “ती”ला स्थान मिळालंय ह्याचा मनापासून आनंद झालाय. अंक मिळवून नक्की वाचा. संग्रही ठेवण्यालायक आहे अगदी.

आता वेळ मिळेल तसा निवांत वाचणार आहे मी… घाई न करता आस्वाद घ्यायचाय.

Read Full Post »

आकाश पेटले होते
त्या कातर संध्याकाळी
अंतरात उमटत होत्या
कवितेच्या अलगद ओळी….

जयश्री

#माझी_फोटोगिरी
#जयूच्या_कविता

Read Full Post »

तुझा स्पर्श होताच फुललो नव्याने
बहरलो पुन्हा मी बहरतोच आहे

✍जयश्री

Read Full Post »

एकटाच उरलो मी
सरले सारेच बहर
होते माझे घरटे
या इथल्या फांदीवर

#माझी_फोटोगिरी
#सुबहकेनजारे

Read Full Post »

ऊब मायेची किती आतून आहे
पालवी शिशिरातही बिलगून आहे
(जानेवारीतली सकाळ)

Read Full Post »

Older Posts »