Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

🌹एका सुंदर कार्यक्रमाचं आमंत्रण🌹

रविंद्र दुरुगकर सरांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “कलावंतांच्या मनातील मान्यवर” ह्या कार्यक्रमाचं हे पाचवं पुष्प आहे. सुप्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तीच्या मुलाखतीतून त्यांचा जीवनप्रवास उलगडतांना कलाक्षेत्रातल्या वेगवेगळ्या कलावंतांकडून त्यांना छोटीशी मानवंदना दिली जाते. कॅरिकेचर, पोर्टेट, संगीत, काव्य हे सगळं मुलाखतीच्या दरम्यान प्रत्यक्ष सादर केलं जातं.

तर यावेळचे मान्यवर आहेत, “गोष्ट एका पैठणीची” ह्या राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त मराठी सिनेमाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक “शंतनू रोडे”. हे मूळचे विदर्भातले असल्यामुळे आपल्या नागपुरकरांच्यावतीने चिटनवीस सेंटरने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. ह्यात माझासुद्धा सहभाग आहे.

एका वेगळ्या, सुंदर संकल्पनेला साकारण्यासाठी रसिक प्रेक्षक हवेतच. तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण !

मनडोह

आकाश पेटले होते
त्या कातर संध्याकाळी
अंतरात उमटत होत्या
विरही कवितेच्या ओळी

कासाविस गूढ उदासी
चादर काळोखी वरती
श्वासांची नुसती धडपड
हृदयाच्या वेशीवरती

व्याकुळ अस्वस्थ क्षणांच्या
पलित्यांचे नृत्य सभोती
संभ्रमात मनडोहाच्या
खळबळ आगंतुक होती

विवरात कृष्ण एकांती
चाहूल कुणाची होती
अंधार भेदुनी किरणे
हलकेच उतरली होती

भ्रम संभ्रम नैराश्याचे
निमिषात वितळले होते
तिमिरात गडद रात्रीच्या
मन लख्ख उजळले होते

जयश्री कुलकर्णी अंबासकर

वसंतातले विभ्रम

काल विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या वसंतोत्सवातलं सादरीकरण 😊

वसंतोत्सव

याद आयेंगे ये पल

आजची दुसरी संगीतवार्ता 😊

आज गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं आणखी एक गाणं प्रकाशित झालंय.

“याद आयेंगे ये पल”

नव्या पिढीची ही फार गुणी, काहीतरी नवं करून दाखवण्याची मनापासून इच्छा बाळगणारी ही मुलं…!

“रिषभ हाटे” हा माझा संगीतकार मित्र संदेश हाटेचा मुलगा आणि त्याचं हे पहिलं Composition. मला ह्या मुलांची style आणि Treatment खूप आवडली. Singing तर अफलातून आहे. त्यांच्या ट्यूनवर शब्द लिहितांना मजा आली. त्यांना काय हवं ते त्यांना नक्की माहिती होतं.

पुढच्या पिढीसाठी शब्द लिहिणं हा एक interesting n Challenging task असतो पण तो आनंददायी असतो 😊

All The Best for more n more Compositions Rishabh n Team 😊👍

हे गाणं तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर ऐकू शकता

https://spotify.link/c9AABlvkEIb