
एक नितांतसुंदर हळुवार चित्रपट !
१९९५ मधे प्रकाशित झालेला सुप्रसिद्ध सिनेमा बघण्याचा आत्ता योग आला.
क्लिंट ईस्टवूड आतापर्यंत फक्त Stylish Cow Boy च्या भूमिकेतलाच माहिती होता. पण त्याने अनेक चित्रपट दिग्दर्शित सुध्दा केले आहेत हे माहितच नव्हतं. अर्थात त्याबद्दल फारच कमी आहे माझं सामान्यज्ञान.
मेरिल स्ट्रिप अतिशय आवडती असल्यामुळे तर सिनेमा बघताना खूप मजा आली.
सिनेमा फारच सुंदर खुलवत नेलाय. एका साधारण गृहिणीच्या आयुष्यात फक्त चार दिवसांसाठी एक फोटोग्राफर येतो आणि तिचं विश्व कसं बदलतं… हे फार सुंदर दाखवलंय. संपूर्ण सिनेमा फ्लॅशबॅक मधे उलगडत जातो. फार काही सांगून सिनेमा बघण्याची मजा न घालवता एवढंच म्हणेन की आतापर्यंत बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा.
प्रतिक्रिया व्यक्त करा